शंतनू राऊळकर सेट परीक्षा उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:00+5:302021-04-12T04:12:00+5:30
अमरावती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे २७ डिसेंबर २०२० रोजी आयोजित राज्य पात्रता परीक्षेचा निकाल ७ एप्रिल रोजी ...

शंतनू राऊळकर सेट परीक्षा उत्तीर्ण
अमरावती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे २७ डिसेंबर २०२० रोजी आयोजित राज्य पात्रता परीक्षेचा निकाल ७ एप्रिल रोजी जाहीर झाला. शंतनू राऊळकर यांनी १७० गुण मिळवून ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी एम.एस्सी. पदवी फिजिक्स विषयात शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था येथून पूर्ण केली. एम.एस्सी.त "डाय सेन्सिटाइज्ड सोलर सेल" या विषयावर त्यांनी संशोधन केले. त्यांनी यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले.
---------------
राष्ट्रीय मूटकोर्ट स्पर्धेत आकांक्षा असनारेचे सुयश (फोटो घेणे)
अमरावती : नवी दिल्ली येथे ९ व १० एप्रिल रोजी सी.पी.जे. विधी महाविद्यालयात पाचवी राष्ट्रीय मूटकोर्ट स्पर्धा पार पडली. यात आकांक्षा अविनाश असनारे हिने सर्वोत्कृष्ट वक्त्याचा पुरस्कार प्राप्त केला. आकांक्षा ही स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. या संघात तिच्यासोबत हितेश ग्वालानी व संकेत इंगळे यांनीही सहभाग घेतला. या संघाला डॉ. राजेश पाटील, इतर शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.