शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

शंकर पटावर बंदी

By admin | Updated: December 26, 2015 00:19 IST

न्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण लावले. शेतकरी बैलांना उत्कृष्ट खाद्य घालून त्याची पोटच्या मुलाप्रमाणे जोपासना करतो.

३०० वर्षांची परंपरा मोडीततळेगाव परिसरात नाराजी : शेतकऱ्यांच्या करमणुकीवर घाला वसंत कुळकर्णी तळेगाव दशासरन्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण लावले. शेतकरी बैलांना उत्कृष्ट खाद्य घालून त्याची पोटच्या मुलाप्रमाणे जोपासना करतो. मात्र शंकरपटाच्या माध्यमातून त्यांची परवड होत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी न्यायालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शंकरपटाच्या निमित्ताने घडविलेला बैल उत्तम सशक्त चपळ व शेतीकामासाठी उत्कृष्ट असतेच बहुतांश शेतकरी अल्पवयीन बैलांना बदाम, दूध, लोण्याचे गोळे, कणकीचे उंडे व अंडी चारून धष्टपुष्ट व चपळ व गुळगुळीत बनवून शर्यतीत उत्तम धावण्यायोग्य बनवितात. त्याची दररोज साबणीचे आंघोळ घालून अंगाळा खराळा करतात. त्याच्या तब्येतीची यथायोग्य काळजी घेऊन वेळीच औषधोपचार करतात. त्याला थोडीशीही दुखापत होऊ नये, याची काळजी घेतात. तळहाताचे फोडाप्रमाणे जपतात. अशा बैलांना शेतकरी निर्दयीपणे कसा वागवू शकणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. एरवी एका बैलाची किंमत ३० ते ४० हजार रुपये असते. या घडविलेल्या बैलांची किंमत चारचाकी वाहनांएवढी असते. अशा बैलांची शेतकरी कधीही छड काढू शकत नाही. शेती कामासोबतच शर्यतीत आपला बैल कसा अव्वल ठरेल याच प्रयत्नात बळीराजा असतो. पूर्वीच्या काळात करमणुकीचे साधन उपलब्ध नसल्याने बैलांच्या स्पर्धा भरत होत्या. उत्कृष्ट जोडीसाठी हजारो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली जात होती. या स्पर्धेत शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहत होता. अशातूनच शंकर पटाची संकल्पना पुढे आली. बैलांच्या शर्यती, रेड्यांच्या टकरी, कोंबड्यांच्या झुंजी सुरू झाल्या. अशा बैलांची उत्तमरीत्या काळजी शेतकरी घेतो. बैलांची निगा राखण्यासाठी कामावर गडी माणूस ठेवला जातो. एकीकडे प्राण्यांची कत्तल होत असताना अशा कत्तल खान्यांवर शासनाने निर्बंध लावला नाही. शेकडो जनावरे कसायांच्या दावनीला बांधून कत्तल खान्याकडे नेली जातात. यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस घडत आहे.तळेगावच्या पटाला गौरवशाली परंपरासुमारे ३०० वर्षांची परंपरा तळेगाव दशासर येथील श्ांकरपटाला लाभली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून नामांकित बैलजोड्या येथे दरवर्षी दाखल होत होत्या. स्थानिक कृषक सुधार मंडळाच्यावतीने या पटाचे जंगी आयोजन करण्यात येते. पटाच्या निमित्ताने परिसरात यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यात्रेत शेतीउपयोगी साहित्याची विक्रीसुध्दा केली जाते. या पटात बैलाला पुराणी टोचण्यास बंदी आहे. त्यामुळे बैलाच्या शरीराची काळजी येथे घेण्यात येते. परंतु न्यायालयाने पट भरविण्यावर यंदा बंदी घातल्याने तळेगावचा ऐतिहासिक शंकरपट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.