पुण्यतिथी महोत्सवातून शंकर महाराजांना हद्दपार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 00:36 IST2016-09-09T00:36:27+5:302016-09-09T00:36:27+5:30
समाजातील अंधश्रद्धेवर आपल्या वाणी व भजनाद्वारे घणाघाती प्रहार करणारे पुरोगामी विचाराचे द्रष्टे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

पुण्यतिथी महोत्सवातून शंकर महाराजांना हद्दपार करा
मागणी : विविध संघटनांचे तिवसा तहसीलदारांना निवेदन
तिवसा : समाजातील अंधश्रद्धेवर आपल्या वाणी व भजनाद्वारे घणाघाती प्रहार करणारे पुरोगामी विचाराचे द्रष्टे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात तीर्थस्थापनेसह मौन श्रद्धांजली व कुठल्याही कार्यक्रमात स्थान देऊ नये, अशी अग्रणी मागणी छत्रपती संघटना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच तिवसा तालुक्याच्यावतीने गुरुवारी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
शंकर महाराजांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात ११ वर्षीय दोन बालकांचा नरबळीसाठी जीव घेण्याचा घृणास्पद प्रकार झाला आहे. या प्रकरणात शंकर समाजावरदेखील आरोप होत आहे व या शंकर महाराजांच्या हस्ते राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी पर्वात तीर्थस्थापना केली जाते व श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात देखील हे महाराज उपस्थित असतात. राष्ट्रसंतांनी समजावून अंधश्रद्धा नाहीसी व्हावी, यासाठी परखड टीका करून समाजाला पुरोगामी विचाराची दिशा दिली आहे. त्यामुळे यापुढे राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवात राष्ट्रसंतांना स्थान देऊ नये, अन्यथा आम्ही त्यांना हुसकावून लावू, अशी गर्भीत इशारा निवेदनाद्वारे शासनाला देण्यात आला.
यावेळी वैभव काकडे, अमर वानखडे, प्रसाद लाजूरकर, मयूर गेडाम, गजानन गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)