शकुंतलेचे गरम पाणी, कोळशाची चोरी अन् फुकटात प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 09:57 PM2018-12-16T21:57:55+5:302018-12-16T21:58:19+5:30

शकुंतला वाफेच्या इंजिनवर चालायची. अचलपूर रेल्वे स्थानकावर आली की परिसरातील सर्व नागरिक बकेट घेऊन तिथे धावायचे. थंडीच्या दिवसांत शकुंतलेच्या डब्यातून गरम पाणी नागरिक घेऊन जात होते आणि त्याने अंघोळ करायचे.

Shakuntala's hot water, theft of charcoal and the futuristic journey | शकुंतलेचे गरम पाणी, कोळशाची चोरी अन् फुकटात प्रवास

शकुंतलेचे गरम पाणी, कोळशाची चोरी अन् फुकटात प्रवास

Next
ठळक मुद्देआठवणींना उजाळा

परतवाडा : शकुंतला वाफेच्या इंजिनवर चालायची. अचलपूर रेल्वे स्थानकावर आली की परिसरातील सर्व नागरिक बकेट घेऊन तिथे धावायचे. थंडीच्या दिवसांत शकुंतलेच्या डब्यातून गरम पाणी नागरिक घेऊन जात होते आणि त्याने अंघोळ करायचे. काही तर कोळसा नेऊन स्वयंपाकाची सोय लावायचे. मात्र, आम्ही शिक्षणासाठी पैसे नसल्याने अनेकदा फुकट प्रवास केल्याचा अनुभव रविवारी शकुंतला रेल्वेत कविसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या नेत्यांनी सांगून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शिक्षणासाठी अचलपूर परतवाडा शहरात यावे लागत होते. खेडेगावांतून ये-जा करण्यासाठी बसगाडी खासगी वाहने नव्हत्या. रस्ते नव्हते. त्यामुळे सर्वांच्या प्रवासाचे साधन म्हणजे शकुंतला रेल्वे. या शकुंतलेतून प्रवास करण्याची मौज काही औरच होती. सातेगावहून पायी निघाल्यावर बैलगाडीने तेथून अचलपूरचा प्रवास केल्याचा अनुभव जि.प. सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी सांगितला. शिक्षणासोबतच तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करायला परिसरातील नागरिकांना शकुंतलेचा प्रवास सोयीस्कर होता. बालवयात अचलपूर पं.स.चे सभापती देवेंद्र पेठकर यांनी 'लोकमत'शी बोलताना कथन केला. परतवाडा, अचलपुरात ये -जा करण्यासाठी पैसे नसल्याने अनेकांनी तिचा विनातिकीट प्रवास केल्याचे सांगितले.
नागरिकांची झुंबड
कापूस सागवान कृषिमाल

विदर्भातील पांढरे सोने व सागवान साठी शासक इंग्रजांनी शकुंतला रेल्वे मूर्तिजापूर ते अचलपूर सुरू केली होती. त्यासाठी सहा माल डब्बे आणि प्रवाशांसाठी सात डब्बे शकुंतलेला होते. दिवसातून अपडाऊनच्या चार फेऱ्या शकुंतला करायची. पर्याय नसल्याने शकुंतला प्रवाशांची झुंबड होत असल्याचा अनुभव सेवानिवृत्त स्टेशन मास्तर रियाज मोहम्मद शेर मोहम्मद यांनी सांगितला. अंजनगाव परिसरातून संत्री, शेतमालसुद्ध शकुंतला रेल्वेमध्ये शेतकरी नेत होते.

दोन बकेट गरम पाण्याने परिवाराची आंघोळ
दिवसातून चार फेºया करणाºया शकुंतला रेल्वेत वाफेचे इंजिन असल्याने पाण्याचे चेंबर होते. हिवाळा व पावसाळ्याच्या दिवसांत मिल कॉलनी व परिसरातील नागरिक शकुंतला येताच बादल्या घेऊन यायचे दोन-दोन पातेल्यात गरम पाणी आंघोळीसाठी घेऊन जात असे. स्वयंपाकासाठी कोळसाही येत असल्याचा अनुभव विदर्भ मिलचे सेवानिवृत्त कामगार प्रकाश पुसदकर यांनी सांगितला.

 

Web Title: Shakuntala's hot water, theft of charcoal and the futuristic journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.