सखींनी गिरविले अभिनयाचे धडे

By Admin | Updated: May 24, 2016 00:44 IST2016-05-24T00:44:04+5:302016-05-24T00:44:04+5:30

लोकमत सखीमंच व अव्दैत नाट्यसंस्थेच्यावतीने महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासह त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ...

Shakespeare acting lessons | सखींनी गिरविले अभिनयाचे धडे

सखींनी गिरविले अभिनयाचे धडे

अमरावती : लोकमत सखीमंच व अव्दैत नाट्यसंस्थेच्यावतीने महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासह त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अभिनय कार्यशाळा शनिवारी घेण्यात आली. कार्यशाळेला महिलांचा भक्कम प्रतिसाद लाभला. सखींनी अभिनयाचे विविध पैलू अवगत केले.
स्थानिक लोकमत भवनात हा कार्यक्रम पार पडला. कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून नाट्यकलावंत विशाल तराळ होते. यावेळी सखींना एकल अभिनय, फिल्म अभिनय, नाट्य अभिनयासारखे प्रकार शिकविण्यात आले. तसेच रंगमंचाची रचना, कॅमेरा, संवाद यासारख्या अनेक बाबींचे सखोल ज्ञान महिलांनी आत्मसात केले. सदर कार्यशाळेस सखी मंचच्या संयोजिका स्वाती बडगुजर, विद्या सरोदे, हर्षा गोरटे, सीमा कोरपे, उज्वला रुपनारायण, ज्योती बोकडे, सोनाली होले, मंजु मांजरे, माधुरी बाराहाते आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Shakespeare acting lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.