शैलेश नवल नवे जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:40 IST2019-02-08T22:40:29+5:302019-02-08T22:40:50+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी भारतीय प्रशासनिक सेवेतील १३ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवल यांची पदस्थापना करण्यात आली आहे.

शैलेश नवल नवे जिल्हाधिकारी
अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी भारतीय प्रशासनिक सेवेतील १३ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवल यांची पदस्थापना करण्यात आली आहे. ते सध्या वर्धा येथे जिल्हाधिकारी आहेत. १ डिसेंबर २०१८ रोजी रुजू झालेले विद्यमान जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना पदस्थापनेची प्रतीक्षा आहे. अवघ्या सव्वा दोन महिन्यांत त्यांची बदली करण्यात आली.