२५ मे रोजी अनुभवता येणार शून्य सावलीचा थरार
By Admin | Updated: May 19, 2016 00:13 IST2016-05-19T00:13:43+5:302016-05-19T00:13:43+5:30
गुरुवार २५ मे रोजी दुपारी १२ वाजता सूर्य अमरावतीकरांच्या अगदी डोक्यावर येणार आहे.

२५ मे रोजी अनुभवता येणार शून्य सावलीचा थरार
खगोलीय घटना : पृथ्वीचा अक्ष कलल्याने अनुभवता येणार स्थिती
अमरावती : गुरुवार २५ मे रोजी दुपारी १२ वाजता सूर्य अमरावतीकरांच्या अगदी डोक्यावर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. सरळ उभ्या वस्तुंची तर सावलीच दिसणार नाही.
२२ मार्च रोजी पृथ्वीचे दोन्ही ध्रूव हे सूर्याकडे असतात. त्यामुळे यादिवशी समान दिवस व रात्र असते. या दिवशी विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. मात्र त्यानंतर पृथ्वी जसजसी आपल्या कक्षेत पुढे जाते, तसतसा पृथ्वीचा उत्तर ध्रूव अधिकाअधिक सूर्याकडे झुकतो. त्यामुळे २२ मार्चनंतर विषुववृत्ताच्या उत्तरेकडील अक्षावर सूर्यकिरण क्रमाक्रमाने लंबरूप पडतात. जास्तीत जास्त २१ जूनपर्यंत २३.३० अंश उत्तर अक्षवृत्तावर मध्यान्हाला सूर्यकिरण लंबरुप पडतात. या वृत्तास कर्कवृत्त, असे म्हणतात.
२१ जूननंतर पृथ्वी, प्रदक्षिणा मार्गावर पुढे जात राहते. तेव्हा २३ सप्टेंबर या दिवशी पुन्हा पृथ्वीचे दोन्ही ध्रूव सूर्यासमोर येतात व विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरुप पडतात. अर्थातच या दिवशी पुन्हा दिनमान सारखे अनुभवण्यास मिळते. परंतु यानंतर पृथ्वी जसजसी आपल्या कक्षेवरून पुढे जाते, तसतसा पृथ्वीचा दक्षिण ध्रूव अधिकाअधिक सूर्याकडे कलतो. २३ सप्टेंबरनंतर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षवृत्तावर सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरुप पडत जातो व शेवटी २२ डिसेंबर या दिवशी २३.३० अंश दक्षिण अक्षवृत्तावर मध्यान्हीला सूर्यकिरण लंबरुप पडत जातात. व शेवटी २२ डिसेंबर या दिवशी २३.३० अंश दक्षिण अक्षवृत्तावर मध्यान्हाला सूर्यकिरण लंबरुप पडतात. या वृत्तास मकरवृत्त, असे म्हणणात. या दिवशी मध्यान्हाला सूर्य मकरवृत्तावर बरोबबर डोक्यावर येतो. दक्षिण गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस असतो. उत्तर गोलार्धात या दिवशी रात्र सर्वात मोठी असते.
कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषेच्या मध्य पट्ट्यातच सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरुप पडत असतात. त्यामुळे या भागातच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे व मकरवृत्ताच दक्षिणेकडे कधीच सूर्य डोक्यावर येत नाही. त्यामुळे येथे नेहमीच तिरपी सावली पडते. पृथ्वीचा अक्ष जर सरळ ९० अंशात असता तर फक्त विषुवत्तावरच नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती. आपला भारत देश उत्तर गोलार्धात असून गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोरमा प्रांतातून कर्कवृत्ताची रेषा गेली आहे. तेव्हा भारताच्या दक्षिण टोकांपासून सूर्य क्रमाक्रमाने सरकत जाऊन या रेषेपर्यंत २१ जूनला डोक्यावर आलेला असेल. यापुढील उत्तरेकडील प्रदेशात सूर्य कधी डोक्यावर येणार नाही.
२५ मे अमरावती नंतर २६ मे भुसावळ, जळगांव व नागपूर येथे शून्य सावलीचा आनंद घेता येणार असल्याचे मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे प्रवीण गुल्हाने, रोहित कोठाडे, भूषण ब्राम्हणे व पंकज गोपतवार यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)