लैंगिक अत्याचार पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती, बडनेरा पोलिसांनी तिघांना केली अटक
By पवन देशपांडे | Updated: December 20, 2017 18:25 IST2017-12-20T18:24:41+5:302017-12-20T18:25:38+5:30
बडनेरा पोलिसांनी १५ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात बुधवारी तिघांना अटक केली.

लैंगिक अत्याचार पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती, बडनेरा पोलिसांनी तिघांना केली अटक
अमरावती - बडनेरा पोलिसांनी १५ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात बुधवारी तिघांना अटक केली. गोविंदा ईश्वरसिंह पवार (२२), जीवन अंबादास चंदेल (३५) व जीवनच्या चांदुरी येथील २८ वर्षीय मित्राचाही यामध्ये समावेश आहे. ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, सदर १५ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसह राहते. आरोपींनी धमक्या देऊन वेगवेगळ्या कालावधीत विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली आहे. तिने मंगळवारी बडनेरा पोलीस ठाणे गाठून आरोपी तरुणांविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३७६ (२) (एन), (आय), ५०६, आर/डब्ल्यू ४, ८, १२ पॉक्सो कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
पित्याच्या शोधासाठी डीएनए टेस्ट होणार
पीडित मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. दरम्यानच्या काळ्यात ती गर्भवती झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळ हे तिघांपैकी कोणाचे, याचा शोध घेण्यासाठी प्रसूतीनंतर बाळाचे डीएनए टेस्ट केली जाणार आहे.
सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली. मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती पुढे आली आहे. बाळाचा जन्म झाल्यावर डीएनए टेस्टद्वारे पित्याची ओळख होईल.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती