अल्पवयीनाचा दोन मुलींवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:30 IST2019-07-03T23:29:51+5:302019-07-03T23:30:04+5:30
दोन अल्पवयीन मुलींवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी तिवसा तालुक्यात घडली. तो मुलगा पसार झाला आहे.

अल्पवयीनाचा दोन मुलींवर लैंगिक अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : दोन अल्पवयीन मुलींवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी तिवसा तालुक्यात घडली. तो मुलगा पसार झाला आहे.
तालुक्यातील एका गावात सात वर्षीय दोन मुली शाळेतून घरी परतल्या. यावेळी दोघींचे आई-वडील शेतात कामावर होते. त्या एकट्या असल्याची संधी साधून घराजवळील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्यांना खेळायला घरात नेले आणि तेथे दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. मुली रडत असल्याने आई-वडिलांनी त्यांना विचारले असता, हा घृणास्पद प्रकार उघड झाला. घटनेची माहिती मिळताच एका मुलीच्या वडिलांनी तिवसा पोलिसांत घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून एका १६ वर्षीय मुलाविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२) (आय), ३५४ तसेच पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीने गावातून पळ काढला असल्याने त्याला अटक झाली नाही. तिवसा पोलीस पुढील तपास करीत आहेत.