मुलीवर लैंगिक अत्याचार, सावत्र पित्याला जन्मठेप
By Admin | Updated: November 1, 2014 01:25 IST2014-11-01T01:25:49+5:302014-11-01T01:25:49+5:30
मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम सावत्र बापाला स्थानिक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी बाल ...

मुलीवर लैंगिक अत्याचार, सावत्र पित्याला जन्मठेप
अमरावती : मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम सावत्र बापाला स्थानिक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याच्या कलम ६ अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
विधी सूत्रांनुसार, आरोपीचे नाव दिलीप टेकन (४२) असे आहे. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बडनेरा मार्गावरील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ वर्ष २०१३ मध्ये घडली होती. आरोपी दिलीप याचे एका विधवेसोबत अनैतिक संबंध होते. घटनेच्या तीन वर्षांपूर्वी दोघेही लग्न न करताच एकत्र राहात होते. विधवा महिलेला १६ वर्षांची एक मुलगी आणि एक लहान मुलगा आहे. सदर महिला जानेवारी २०१३ मध्ये काही कामानिमित्त मध्य प्रदेशच्या बैतूल येथे दोन-चार दिवसांपूर्वी गेली होती. मुलगी घरी एकटीच होती. याच संधीचा फायदा उचलून दिलीपने अल्पवयीन मुलीवर दोन दिवस बलात्कार केला. मुलीने ती गर्भवती झाल्यानंतर ही बाब आईला सांगितली.
आईच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी १ एप्रिल २०१३ मध्ये आरोपी दिलीप टेकनविरूध्द कलम ३७६ व बाल लैंगिक प्रतिबंधक काद्यातील कलम ६,४ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. महिला उपनिरीक्षक सुषमा बाविस्कर यांनी प्रकरणाची चौकशी करून ३० जून रोजी न्यायालयात चार्जशिट दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी दिलीप टेकन याला आजीवन कारावास, दोन हजार रूपये दंड आणि एक वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील सुनील देशमुख व परवेज खान यांनी काम पाहिले.