स्वयंपाकीचा महिलेवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:32 IST2018-12-04T22:31:47+5:302018-12-04T22:32:20+5:30

स्वयंपाकी इसमाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी प्रबुद्धनगरात उघडकीस आली. फे्रजरपुरा पोलिसांनी तासाभरातच आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. संदीप लक्ष्मण परतेकी, असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sexual harassment on cookie woman | स्वयंपाकीचा महिलेवर लैंगिक अत्याचार

स्वयंपाकीचा महिलेवर लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देप्रबुद्धनगरातील घटना : आरोपीला तासाभरात अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वयंपाकी इसमाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी प्रबुद्धनगरात उघडकीस आली. फे्रजरपुरा पोलिसांनी तासाभरातच आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. संदीप लक्ष्मण परतेकी, असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी संदीप व ३० वर्षीय पीडित महिला हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून तपोवन येथील प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्र येथे स्वयंपाकी म्हणून काम करतात. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या ओळखीचेच होते. पीडित महिला घटस्फोटीत असल्यामुळे ती प्रबुद्ध नगरातील माहेरी आईसोबत राहत होती. प्रबोधिनीतील कामावेळी संदीप पीडितावर वाईट नजर ठेवून राहत होता. ही बाब पीडिताच्या लक्षात आली होती. दरम्यान चार दिवसांपूर्वी संदीपने पीडिताला एकटे पाहून जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावेळी पीडिता पळून गेली. त्यानंतर दोन दिवस पीडिता कामावर गेली नाही. पीडिता कामावर न आल्याचे पाहून संदीप तिच्या प्रबुद्ध नगरातील घरी पोहोचला. ती घरात एकटी असल्याचे पाहून संदीपने तिच्यावर जळजबरीने बलात्कार केला. या घटनेची तक्रार पीडिताने फे्रजरपुरा पोलिसात नोंदविली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४५२,३५४,३७६,५०६ गुन्हा नोंदविला आहे. अंतर्गत गुन्हा नोंदविला.गुन्हा दाखल होताच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात एएसआय चिमोटे यांनी डीबी पथकासह जाऊन संदीपला तासाभरातच अटक केली.

Web Title: Sexual harassment on cookie woman