प्रेमदिनी युवकाचा मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:23 IST2021-02-18T04:23:58+5:302021-02-18T04:23:58+5:30

अमरावती : मैत्रिणीला चाकुचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना गाडगेनगर ठाण्यांतर्गत अर्जुननगरनजीकच्या टेलिफोन कॉलनीत ...

Sexual abuse of a young man's girlfriend on Valentine's Day | प्रेमदिनी युवकाचा मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार

प्रेमदिनी युवकाचा मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार

अमरावती : मैत्रिणीला चाकुचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना गाडगेनगर ठाण्यांतर्गत अर्जुननगरनजीकच्या टेलिफोन कॉलनीत १४ फेब्रवारी व्हॅलेंटाईन डेला घडली. याप्रकरणी बुधवारी गुन्हा नोंदविला.

विक्की रघुनाथ बाबर (३०, रा. यशोदानगर, कमल कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित २८ वर्षीय युवतीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदिवली. पोलीससूत्रानुसार, फिर्यादी व आरोपी हे मित्र, मैत्रिण आहेत. सदर युवती ही अर्जूननगरात राहायला आली. तेथेही आरोपीने तिला त्रास देणे सुरू केले. १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान आरोपीने तिच्या घरी येऊन मारहाण केली. तसेच चाकुचा धाक दाखवून अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार युवतीने पोलिसांत नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३७६ (२), (एन), ४५२, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपीला अटक केली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम करीत आहेत.

Web Title: Sexual abuse of a young man's girlfriend on Valentine's Day