सावत्र बापाचा मुलीवर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: September 22, 2016 00:13 IST2016-09-22T00:13:08+5:302016-09-22T00:13:08+5:30
सावत्र बापाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

सावत्र बापाचा मुलीवर लैंगिक अत्याचार
वडिलांसह आईलाही अटक : रमाबाई आंबेडकरनगरातील घटना
अमरावती : सावत्र बापाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना रमाबाई आंबेडकर नगरात घडली .गाडगेनगर पोलिसांनी पीडिताच्या वडिलांसह आईलाही अटक केली आहे.
चार वर्षापूर्वी पिडीता ही अल्पवयीन असताना सावत्र बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु केलेत. सद्यास ती पीडित युवती १९ वर्षाची असून बीए भाग १ ची विद्यार्थीनी आहे. पीडित मुलगी ही रमाबाई आंबेडकर नगरात सख्या आई-वडिल व एका बहिणीसोबत राहत होती.
तिच्या वडिलाने दुसरे लग्न केले. त्यामुळे तिच्या आईनेही दुसरे लग्न करून सावत्र वडिलांना घरी आणले. त्यानंतर तीने वसतीगृहात राहून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. चार वर्षापूर्वी ती पुन्हा घरी राहू लागली. मात्र, सावत्र वडील आपल्यावर वाईट नजर ठेऊन असल्याचे पीडिताच्या लक्षात आले. पीडिताने अनेकदा त्ऱ्यांना हटकले. मात्र,तिच्या आईने सावत्र बापाच्या कुकर्मावर पडदा टाकला.
गोळ्यांच्या गुंगीत सावत्र वडिल लैगिक चाळे करीत असल्याचे पीडिताच्या अनेकदा निदर्शनास आले. पीडित मुलगी सकाळी उठली की तिच्या शेजारीच वडिल दिसायचे. तीला होणाऱ्या वेदनातून लैंगिक अत्याचार झाल्याचे तिला कळायचे. त्यामुळे तिने एकदा जिल्हा स्त्रि रुग्णालयात तपासणी करून घेतली. तेथील डॉक्टरांनी सुध्दा लैगिंक संबध झाल्याचे पीडिताला सांगितले होते.
शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
अमरावती : वडिलच लैंगिक अत्याचार करतात आणि आई त्यावर पडदा टाकण्याचे कार्य करीत असल्याचे पाहून पीडिता खचून गेली होती. ही बाब विसरुन जा, कोणालाही सांगू नकोस असे वारंवार पिडिताला घरातून सांगण्यात येत होते. त्यामुळे तीने आजपर्यंत कोणाजवळ या अत्याचाराची वाच्यता केली नाही. मात्र, मंगळवारी पीडित मुलीच्या घरी एनजीओच्या काही महिला कौटुिंबक हिंसाचााराविषयी माहिती जाणून घेण्याकरिता पिडिताच्या घरी गेले होते. त्यावेळी धाडस करून तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती एनजीओ महिलांना दिली. प्रकरणाचे गांभिर्य ओळखून त्या महिलांनीच तिला रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तीच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्या खासगी डॉक्टरांनी तत्काळ या लैंगिक अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरु होती. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी वडिलांविरुध्द भादंविच्या कलम ३७६ २, एन, अ, क, पॉक्सो ४, ८, १२, २१, अन्वये गुन्हा नोंदवून पिडीताच्या आईलाही आरोपी बनविले आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी वडिलास शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गाडगेनगर पोलीस तपास करीत आहे.
यापूर्वी पिडिताच्या
बहिणीची आत्महत्या
पिडिताच्या लहान बहिणीने २००३ मध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. तिच्या मृत्युचे गुढ बाहेर आले नव्हते. त्यामुळे तीच्या आत्महत्येमागे वडिलांच्या लैंगिक अत्याचार कारणीभुत असू शकतो, अशी शंका पीडिताने व्यक्त केली आहे.