शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे शोषणा, गर्भधारणा; आरोपीस अटक

By प्रदीप भाकरे | Updated: December 22, 2022 18:17 IST

चांदूरबाजार ठाण्याच्या हद्दीतील घटना

बेलोरा (अमरावती) : अकरावी इयत्तेतील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लैंगिक शोषणातून गर्भधारणा झाली. पोट दुखत असल्याने तिला बुधवारी दवाखान्यात आणण्यात आले. तेथे सोनोग्राफीनंतर ही धक्कादायक घटना उघड झाली. चांदूरबाजार ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. अंकुश अरविंद इंगळे (२२) रा. अमरावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारीनुसार, आरोपी अंकुशची आजी पीडित १६ वर्षीय मुलीच्या घराशेजारी राहते. अंकुशचे आजीकडे नेहमी येणे-जाणे होते. या काळात त्याची ओळख पीडित मुलीसोबत झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित व मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाल्यावर त्यांच्यात मोबाइलवर संवाद सुरू झाला. पिडिता ही चांदूरबाजार तालुक्यातील एका उच्च माध्यमिक शाळेतील अकरावीची विद्यार्थीनी आहे. दरम्यान जून महिन्यात अंकुश हा तिच्या शाळेत गेला. शाळेला सुटी झाल्यावर अंकुश हा पीडित मुलीला दुचाकीवर बसवून शेतशिवारात घेऊन गेला. शेतातील एका खोलीत लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीला परत सोडून दिले. ऑगस्ट महिन्यात देखील त्याने तिला चांदूरबाजार बसस्थानकाहून एका शिवारात नेले. तेथे देखील त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही दोघांमध्ये टेलिफोनिक संवाद सुरू होता.

असे फुटले बिंग

अलिकडे पीडित मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिच्या आईने २१ डिसेंबर रोजी तिला रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी पीडित मुलगी ही चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. तसेच रुग्णालय प्रशासनाने पीडिता ही अल्पवयीन असल्याचे चांदूरबाजार पोलिसांनाही माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी विनोद इंगळे यांनी रुग्णालय गाठून पीडित मुलीचे बयाण नोंदविले. यावेळी तिने आपबिती कथन केली. पीडित मुलीच्या बयाणावरून चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी अंकुशविरुद्ध अपहरण, बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा मेश्राम करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावतीSexual abuseलैंगिक शोषण