रिद्धपूर येथे सांडपाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST2021-04-07T04:12:51+5:302021-04-07T04:12:51+5:30
घाण, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात रिद्धपूर : श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये सांडपाणी नालीतून रस्त्यावर येत असल्याने घाण ...

रिद्धपूर येथे सांडपाणी रस्त्यावर
घाण, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
रिद्धपूर : श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये सांडपाणी नालीतून रस्त्यावर येत असल्याने घाण पाण्याची गटारगंगा झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तिवसा रस्त्यावर ४० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम केले होते. त्या पुलाची वैधता संपुष्टात आली आहे. पुलाखालील पायल्या गाळामुळे बुजल्या आहेत. परिणामी, वाॅर्ड क्रमांक ६ मधून येणारे सांडपाणीहे पुलाखालून वाहून जात नाही.
ग्रामपंचायत सदस्य सचिन डवके यांनी त्यासाठी ठरावदेखील घेतला. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोर्शी येथे नवीन पूल बांधकाम करण्यात यावे, यासंबंधी तो ठराव होता. परंतु, आजपर्यत या पुलाचे काम करण्यात आले नाही. रिद्धपूर ते तिवसा राज्य महामार्ग ४० किलोमीटरचा असून, त्या मंजूर रस्त्याचे भूमिपूजनसुद्धा झाले. त्याअनुषंगाने रिद्धपूर येथील पूल अधिक जीर्ण झाल्यामुळे या पुलाच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी डवके यांच्यासह गणेश वानखडे, जितू वानखडे, बंटी वानखडे, नितीन वानखडे, मनोज वानखडे व सरपंच गोपाल जामठे यांनी केली आहे.
------------