सुलतानपुरातून सात हजाराची गावठी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST2021-05-15T04:12:25+5:302021-05-15T04:12:25+5:30

तळेगाव दशासर : लगतच्या सुल्तानपूर येथील एका महिलेच्या घरातून पोलिसांनी सात हजार रुपयांची गावठी दारू जप्त ...

Seven thousand village liquor confiscated from Sultanpur | सुलतानपुरातून सात हजाराची गावठी दारू जप्त

सुलतानपुरातून सात हजाराची गावठी दारू जप्त

तळेगाव दशासर : लगतच्या सुल्तानपूर येथील एका महिलेच्या घरातून पोलिसांनी सात हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली. त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. ठाणेदार अजय आकरे हे शुक्रवारी रमजान ईद बंदोबस्त करीत असताना त्यांना सुलतानपूर येथे एक महिला घरून गावरान दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास सदर महिलेच्या घराच्या आवारातील बाथरूममधून एका प्लास्टिकच्या डबकीमध्ये ३५ लिटर गावठी दारू आढळून आली. ही कारवाई ठाणेदार दिलीप सावंत, संजय भोपळे, महादेव पोकळे, नरेश कोलामी, मनीष कांबळे, महिला पोलीस रेणुका पवार, स्वाती शेंडे यांनी केली.

Web Title: Seven thousand village liquor confiscated from Sultanpur