ग्रामिणमधील सात रुग्णालये जनआरोग्य योजनेच्या कक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST2021-06-11T04:09:44+5:302021-06-11T04:09:44+5:30
अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे. यात ग्रामीण रुग्णालयांत ठिकाणी ऑक्सिजन प्लांटचे नियोजन आहे. ...

ग्रामिणमधील सात रुग्णालये जनआरोग्य योजनेच्या कक्षेत
अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे. यात ग्रामीण रुग्णालयांत ठिकाणी ऑक्सिजन प्लांटचे नियोजन आहे. याशिवाय ग्रामीणमधील सात रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राबविण्याचे प्रस्तावित केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यात ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, तिवसा, चिखलदरा, चुर्णी, धामणगाव रेल्वे याशिवाय दयासागर हॉस्पिटल धारणी येथे कोरोना आजाराच्या उपचाराकरिता राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले योजना जनआरोग्य योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले व याकरिता या योजनेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना पत्रदेखील पाठविण्यात आलेले आहे.
तिसऱ्या लाटेदरम्यान कोरोना संसर्गाच्या रुग्णांवर स्थानिक स्तरावर नि:शुल्क उपचार करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत आहे.