शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ४६९ लघुप्रकल्पांत सात टक्के पाणीसाठा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:37 IST

जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे.

अमरावती - जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे, त्या शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भविष्यात सदर प्रकल्प पूर्ण भरले नाहीत, तर यंदा सिंचनाची स्थितीसुद्धा बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४६९ धरणांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ११००.७८ दलघमी आहे. पण, यंदा उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने व पाण्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात सतत घट झाली असून, उपयुक्त पाणीसाठा हा ७७.५२ दलघमी एवढा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदा चांगल्या अपेक्षित पावसाची प्रतीक्षा आहे.  २४ मध्यम प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठालघु प्रकल्पांसारखीच मध्यम प्रकल्पांचीसुद्धा स्थिती यंदा बिकट आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विभागातील २४ मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त १६.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे, तर दोन प्रकल्पांमध्ये आठ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. अकोला तीन व वाशीम जिल्ह्यातील एका प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याने स्थिती बिकट आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भwater scarcityपाणी टंचाई