देवगावात सात महिन्यांच्या चिमुकलीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:41+5:302021-06-02T04:11:41+5:30
फोटो पी ०१ देवगाव अनिल कडू परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत नातेवाइकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगावात सात ...

देवगावात सात महिन्यांच्या चिमुकलीची कोरोनावर मात
फोटो पी ०१ देवगाव
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत नातेवाइकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगावात सात महिन्यांच्या चिमुकलीने आपल्या आईसमवेत कोरोनावर मात केली आहे.
आराध्या धर्मराज चव्हाण (७ महिने, रा. देवगाव) ही चिमुकली आई आशा धर्मराज चव्हाण (३०) यांच्यासमवेत कोरोना संक्रमित झाली होती. आशा धर्मराज चव्हाण या देवगावच्या पोलीस पाटील आहेत. या दोघी मायलेकींनी कोरोनावर विजय मिळविला आहे.
दरम्यान, गावातील १२३ कोरोना रुग्णांपैकी १२१ कोरोना रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून, गावी परतले आहेत. उर्वरित दोघांनवर अचलपूर डेडिकेटेड कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लग्न आणि स्वागत समारंभातून ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या देवगावात २८ एप्रिलपासून कोरोनाने आपले हात पाय पसरले. यात लहान मुलांनाही कोरोनाने ग्रासले. अल्पावधीतच गावातील कोरोना रुग्णांची संख्या १२३ वर पोहोचली. वाढती संख्या बघता आरोग्य यंत्रणेसह अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे, विस्तार अधिकारी एम.एस. कासदेकर यांनी गावात पोहोचून गावकऱ्यांचे प्रबोधन केले.
सरपंच रेखा येवले, उपसरपंच गजानन येवले, ग्रामसेवक जी.आर. पालखडे व आपत्ती व्यवस्थापन समितीने गावात चार वेळा निर्जंतुकीकरण केले. बाहेरून येणाऱ्याला गावबंदी केली. गावातून बाहेर जाणाऱ्यांनवर निर्बंध लादले. गावकऱ्यांनीही सहकार्य केले आणि अवघ्या ३० दिवसांत गावाने कोरोनावर नियंत्रण मिळविले.