सात मृत्यू, ४६२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:42+5:302021-03-09T04:16:42+5:30
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा सात कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण ५६९ बळी ठरले आहेत. दिवसभरात ४६२ अहवाल पॉझिटिव्ह ...

सात मृत्यू, ४६२ पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा सात कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण ५६९ बळी ठरले आहेत. दिवसभरात ४६२ अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३९,९८६ झाली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालानुसार, सोमवारी अचलपूर येथील ७९ वर्षीय महिला, सावळापूर येथील ५२ वर्षीय पुरुष, शिंगणापूर येथील ५० वर्षीय पुरुष आणि अमरावती येथील सुशीलनगरातील ७० वर्षीय महिला, न्यू प्रभात कॉलनीतील ७० वर्षीय महिला, गणेश कॉलनीतील ५१ वर्षीय पुरुष व नारायणनगरातील ५५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून ७०० ते ९०० दरम्यान कोरोनाग्रस्तांची नोंद होत असताना, चार दिवसांत कोरोना संसर्गामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. अजूनही चाचण्यांमध्ये २० ते २५ टक्के पॉझिटिव्हिटी चिंता वाढविणारी आहे. यादरम्यान शनिवारी ६६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत ३२,९६८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ही टक्केवारी ८२.४६ आहे. सद्यस्थितीत ६,४४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.