सेतू नागरी केंद्रांची होणार चौकशी
By Admin | Updated: January 13, 2017 00:05 IST2017-01-13T00:05:06+5:302017-01-13T00:05:06+5:30
महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधे सुरू केलेल्या सेतू नागरी सुविधा केंद्रात ‘दलालराज’ असल्याच्या

सेतू नागरी केंद्रांची होणार चौकशी
नायब तहसीलदारांची नियुक्ती : गैरप्रकार, अनियमितेला आळा बसणार
अमरावती : महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधे सुरू केलेल्या सेतू नागरी सुविधा केंद्रात ‘दलालराज’ असल्याच्या पार्श्वभूमिवर सर्वच केंद्रांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याकरिता नायब तहसीलदारांची चमू गठित करण्यात आली आहे.
महसूल विभागांतर्गत नागरिकांना सुविधा मिळाव्यात, या हेतूने सेतू नागरी सुविधाकेंद्र सुरू केले आहे. मात्र, सेतू नागरी केंद्रांच्या अख्त्यारित नसलेली कामे देखील केंद्र संचालकांद्वारे नागरिकांकडून स्वीकारली जातात. त्यासाठी नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. नागरी सुविधांबाबतचे अधिकार निश्चित करण्यात आले असताना येथील संचालक, कर्मचारी नागरिकांकडून अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने केंद्रांची तपासणी करण्यासाठी तहसीलदार सुरेश बगळे यांनी स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय घेतला. सेतू केंद्रात अनियमितता आढळल्यास महसूल विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन तहसीलदार बगळे यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सेतू केंदाची चौकशी होणार आहे. दरम्यान चौकशी पथक केंद्र परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन चौकशी करेल.