धामणगावात नरबळी विरोधी संघर्ष समितीची स्थापना

By Admin | Updated: August 27, 2016 23:57 IST2016-08-27T23:57:47+5:302016-08-27T23:57:47+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पिंपळखुटा येथील नरबळी प्रकरणाच्या अनुषंगाने धामणगावात नरबळी विरोधी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Setting up of anti-war struggle committee in Dhamanga | धामणगावात नरबळी विरोधी संघर्ष समितीची स्थापना

धामणगावात नरबळी विरोधी संघर्ष समितीची स्थापना

विश्रामगृहात बैठक : सर्वपक्षीय महामोर्चाची तयारी
अमरावती : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पिंपळखुटा येथील नरबळी प्रकरणाच्या अनुषंगाने धामणगावात नरबळी विरोधी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी धामणगाव येथील विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. दादाराव क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेत ३ सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.
पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमशाळेत प्रथमेश सगणे या चिमुकल्याचा नरबळी देण्याच्या उद्देशाने गळा कापण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली. 'लोकमत'ने निर्भीडपणे नरबळी प्रकरणातील तथ्य बाहेर काढलीत. या घटनेची सीआयडी चौकशी झाल्यास यापूर्वी घडलेल्या अनेक घटना उघडकीस येतील, असा विश्वास अ‍ॅड.संजय वानखडे यांनी व्यक्त केला.

विविध संघटना उपस्थित
अमरावती : प्रशासन न्याय देत नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर हजारो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नरबळी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येईल,असे बैठकीदरम्यान ठरविण्यात आले.या बैठकीला अमरावतीसह यवतमाळ ,वर्धा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.आश्रमाचे अध्यक्ष शंकर महाराज यांचे आजपर्र्यत साधे बयानही घेतले नसल्याने यात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची कैफीयत पदाधिकाऱ्यांनी मांडली.
बैठकीला रुपेश खडसे,गणेशदास गायकवाड,महादेव खंडारे,विजय गायकवाड,रंजित पाटेकर,उमेश भुजाडणे ,देवाननद वानखडे,संतोष वाघमारे,निलेश वानखडे,सर्फराज खान आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)नरबळीप्रकरणी सोमवारी अंजनसिंगी बंद
अंजनसिंगी : पिंपळखुटा आश्रम परिसरातील नरबळीप्रकरणी प्रमुख सूत्रधाराला अटक करा, या मागणीसाठी सोमवार २९ आॅगस्ट रोजी अंजनसिंगी येथे सर्वपक्षीय बंदची हाक दिली आहे.
येथील ग्रामपंचायत भवनातून गावात निषेध रॅली काढण्यात येऊन तिचा बसस्टॉपसमोर समारोप होणार आहे. सरपंच अवधूत दिवे, भाकपचे अशोक काळे आदी सभेला संबोधित करणार आहेत.

Web Title: Setting up of anti-war struggle committee in Dhamanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.