सर्व्हिस गल्लीत बायोमेडिकल वेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:31 IST2018-02-20T23:31:35+5:302018-02-20T23:31:54+5:30
अंबापेठस्थित डॉ. पंजाबी यांच्या रुग्णालयामागील सर्व्हीस गल्लीत मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट आढळून आले.

सर्व्हिस गल्लीत बायोमेडिकल वेस्ट
ठळक मुद्देकारवाई शून्य : एमपीसीबी, महापालिकेकडे तक्रार
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अंबापेठस्थित डॉ. पंजाबी यांच्या रुग्णालयामागील सर्व्हीस गल्लीत मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट आढळून आले. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी महापालिका व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्यात आली असून, संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील बायोमेडिकल वेस्ट संकलित करून त्या घनकचºयाचा योग्यस्थळी निचरा करण्यासाठी महापालिकेने एका कंपनीशी करार केला आहे. त्यामुळे ती कंपनी नेमकी काय करते, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यात कालबाह्य झालेल्या औषधींचाही समावेश आहे.