परिचारिकांच्या सेवेला सन्मान मिळावा
By Admin | Updated: May 12, 2015 00:17 IST2015-05-12T00:17:53+5:302015-05-12T00:17:53+5:30
आधुनिक परिचर्येच्या जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन परिचारिका दिन म्हणून...

परिचारिकांच्या सेवेला सन्मान मिळावा
सेवाभाव : दूषित दृष्टिकोन बदलण्याची गरज, फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन
वसंत कुळकर्णी तळेगाव दशासर
आधुनिक परिचर्येच्या जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. रूग्णसेवेच्या कार्यातील त्यांच्या नियमित कार्यामुळे तयंना ‘लेडी विथ लँप’ असेही म्हटले जाते. त्यांनी परिचारिकांना शास्त्रीय पध्दतीने शिक्षण दिले. या दिवसाच्या निमित्ताने परिचर्या सेवेचे महत्त्व सगळ्यांना पटवून देण्याचा व या सेवेकडे पाहण्याचा पारंपरिक व दूषित दृष्टिकोन बदलण्यासाठी या दिवसाच्यानिमित्ताने प्रयत्न करूया.
फ्लोरेंन्स नाईटिंगेल या विदूषीने सर्वप्रथम परिचर्या सेवेची संकल्पना समोर आणली. श्रीमंत कुटूूंबात जन्मलेल्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी स्वेच्छेने परिचर्या सेवा पत्करली. छावण्यांमध्ये राहून त्यांनी जखमी आजारी सैनिकांची सेवा केली. इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ नर्सेस जिनिव्हा यांच्याकडून दरवर्षी परिचर्या सेवेच्या विविध पैलुंवर एक घोषवाक्य प्रसारित करण्यात येते.
परिचर्या सेवेची सुुरूवात उपचारात्मक आरोग्य सेवेतून झालेली दिसलते. आजच्या आधुनिक युगात परिचर्या सेवेचा खूपच विकास झाले आहे. प्रतिबंधात्मक, आरोग्य संवर्धनात्मक, पुनर्वसनात्मक, अशा विविध स्तरांवर तिची उपयुक्तता सिध्द झाली आहे. ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागात राहून गावपातळीवर अहर्निशपणे देणाऱ्या आरोग्य सेविकेच्या कामाचे स्वरूप तसे भिन्न आहे. दुर्गम ग्रामीण भागात राहून सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांना अनेक समस्यांना दररोज तोंड द्यावे लागते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत.
परिचारिकांच्या जबाबदाऱ्या
रूग्णांचे हसून स्वागत करणे, त्याला योग्य ते उपचार मिळवून देणे, रूग्णाला मार्गदर्शनाची गरज असल्यास परिस्थितीनुसार वरिष्ठांची मदत घेणे, रूग्णाच्या नातेवाईकांना योग्य सल्ला देणे, सर्व लाभार्थ्यांना आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देणे.