साश्रृनयनांनी निरोप

By Admin | Updated: July 22, 2016 00:05 IST2016-07-22T00:05:45+5:302016-07-22T00:05:45+5:30

ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचे बळी ठरलेल्या इंगळे कुटुंबातील तिघांवर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंतिमसंस्कार करण्यात आले.

Sermons | साश्रृनयनांनी निरोप

साश्रृनयनांनी निरोप

समाजमन द्रवले : हजारो नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली
सुमित हरकुट चांदूरबाजार
ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचे बळी ठरलेल्या इंगळे कुटुंबातील तिघांवर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंतिमसंस्कार करण्यात आले. किशोर इंगळे, त्यांच्या पत्नी शिल्पा आणि लहानग्या शौर्यचे कलेवर पाहून अनेकांना हुंदका आवरता आला नाही.एका क्षणात आई-वडीलांची वाट बघत असलेला सुजल अनाथ झाला. व त्याच्या वृध्द आजीवर तिघांचे निर्जिव पार्थिव डोळ्यात साठविण्याची दुदैवी वेळ आली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हळहळला. गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास निघालेल्या अंत्ययात्रेत पाच हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात सामाजिक सेवेमध्ये सहभागी असलेले किशोर इंगळे यांना अपरिचित असलेला माणूस विरळच. सहकारी वृत्ती व मृदू स्वभावामुळे प्रत्येकाला हवाहवासा वाटणाऱ्या या व्यक्तिवर व त्यांच्या कुटूंबावर बेधुंद ट्रकचालकाने घाला घातला, यावर क्षणभर कुणाचाही विश्वास बसला नाही. त्यामुळे हजारो नागरिकांनी मिळेल त्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून जनतेचा संतापाचा उद्रेक झाला.
सकाळपासून आपल्या आई-वडीलांची, छोट्या भावाची प्रतीक्षा करीत असलेल्या सुजलला अपघाताबद्दल काहीच माहिती नव्हते. आई आल्यानंतर तिच्यासोबतच जेवणाचा आग्रह सुजलने धरला. अखेर आईवडीलांविना सुजल उपाशी झोपून गेला. सकाळी उठल्यानंतर आईवडीलांसह छोटा शौर्य मृत झाल्याचे त्याला कळले. अवघ्या १० वर्षीय सुजलने त्यावेळी हंंबरडा फोडला. अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. तसेच एकुलत्या एक मुलाला, सुनेला व चिमुरड्या नातवाचे पार्थिव पाहताच वृद्ध आईला दु:ख अनावर झाले. सोबत दोन्ही बहिणींनाही भावासह त्याचे सर्व कुटुंब एका झटक्यात जगाचा निरोप घेवून गेल्याचे दु:ख आवरता आले नाही. इंगळे कुटूंबातील परिजनांची करुण अवस्था उपस्थित हजारो नागरिकांचे डोळे पानावून गेली. सायंकाळी ६ च्या सुमारास मोर्शी रोडवरील हिंदुस्मशानभूमि मार्गाने अंत्ययात्रा निघाली. यावेळी चांदूरबाजारसह पंचक्रोशी उलटली होती.

स्मशानभूमित भोवळ आणि मृत्यूही
हृदयाला हेलावून टाकणारा हा प्रसंग पाहून संजय पंजाबी नामक युवकाला स्मशानभूमितच भोवळ आली. त्यामुळे त्याला राहत्या घरी पाठविण्यात आले. तथापि घरी गेल्यानंतर त्यांचा तीव्र हृदयविकाराने मृत्यू झाला.
 

Web Title: Sermons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.