ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा आज सत्कार सोहळा

By Admin | Updated: August 13, 2016 23:57 IST2016-08-13T23:57:37+5:302016-08-13T23:57:37+5:30

माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्त विमलाबाई देशमुख सभागृहात रविवारी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

Senior Congress leaders today felicitation ceremony | ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा आज सत्कार सोहळा

ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा आज सत्कार सोहळा

काँग्रेसचे आयोजन : अंबा मंदिरात महाआरती
अमरावती : माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्त विमलाबाई देशमुख सभागृहात रविवारी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. यावेळी रावसाहेब शेखावत यांचा जाहीर सत्कार होईल.
शेखावतांच्या वाढदिवसानिमित्त कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, माजी मंत्री सुरेंद्र भुयार, पुरुषोत्तम येते, ज्येष्ठ नेत्या कमलताई गवई, भाऊसाहेब भेले, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके आदी ज्येष्ठ नेत्यांचा हृदयसत्कार करण्यात येणार आहे. त्यापूर्वी सकाळी ९ वाजता अंबादेवी मंदिरात महाआरती केली जाईल. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या दृष्टीने या सोहळयाच्या यशस्वीतेकडे शहरातील राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Senior Congress leaders today felicitation ceremony