शेंदूरजनाघाट येथे उपचाराच्या नावाखाली विवाहितेला विकून टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 06:00 IST2017-09-18T06:00:38+5:302017-09-18T06:00:40+5:30

नजीकच्या शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील २४ वर्षीय विवाहितेला उपचाराच्या नावाखाली, मध्य प्रदेशात नेऊन विकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

Sendurajnaghat sold it to the marriage in the name of treatment | शेंदूरजनाघाट येथे उपचाराच्या नावाखाली विवाहितेला विकून टाकले

शेंदूरजनाघाट येथे उपचाराच्या नावाखाली विवाहितेला विकून टाकले

वरूड (अमरावती) : नजीकच्या शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील २४ वर्षीय विवाहितेला उपचाराच्या नावाखाली, मध्य प्रदेशात नेऊन विकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी दोन महिलांसह चौघांना अटक केली आहे.
जीवन मांगीलाल मेवाडा (३६), जीवनसिंग भादरसिंग मेवाडा (२७), कमलाबाई मंगलसिंग ऊईके (५०) आणि सरिता दीपक जोगेकर (४०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कमलाबाई हिच्या सांगण्यावरून सरिता या पीडितेला उपचारासाठी वरूड येथे घेऊन आली. येथे कमलाबाईचा जावई जीवन मेवाडा याची भेट घालून दिली. तो काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून, पीडितेला मध्य प्रदेशच्या आष्टा या गावी घेऊन आला. तेथे ३५ हजार रुपयांत पीडितेचा सौदा केला़

Web Title: Sendurajnaghat sold it to the marriage in the name of treatment