सेमाडोह बँकेचा तो कर्मचारी सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:17+5:302021-02-05T05:23:17+5:30

वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतली दखल : दारू पिऊन गोंधळ चिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह येथील स्टेट बँकेच्या शाखेतील दारू पिऊन धिंगाणा ...

The Semadoh Bank employee is on compulsory leave | सेमाडोह बँकेचा तो कर्मचारी सक्तीच्या रजेवर

सेमाडोह बँकेचा तो कर्मचारी सक्तीच्या रजेवर

वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतली दखल : दारू पिऊन गोंधळ

चिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह येथील स्टेट बँकेच्या शाखेतील दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत सक्तीच्या रजेवर पाठविले. बँकेला भरदिवसा बाहेरून कुलूप लावून आदिवासींना शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सेमाडोह येथे घडला होता.

४० पेक्षा अधिक दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी पाड्यांसाठी एकमेव असलेल्या सेमाडोह येथील स्टेट बँकेच्या कारभाराबद्दल अनेक दिवसांपासून आदिवासींमध्ये संताप व्यक्त होत होता. आदिवासींना नाहक त्रास देण्यासोबत आर्थिक लुबाडणूक केली जात होती, तर मनमर्जीप्रमाणे बँकेचे टाळे उघडले जात होते. शुक्रवारी तोच प्रकार पुन्हा उघड होताच जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड व उपस्थित आदिवासींनी यासंदर्भात जिल्हा प्रशासन, तहसीलदार व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली होती. दुसरीकडे ‘लोकमत'ने या प्रकाराबद्दल वृत्त प्रकाशित करताच बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय तिवारी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. आदिवासींना दारू पिऊन शिवीगाळ व उद्धट वागणूक करणाऱ्या शिवा नवघरे नामक कर्मचाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविले. तेथे अन्य कर्मचाऱ्याला देण्यात आले.

--------------

Web Title: The Semadoh Bank employee is on compulsory leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.