टंकलेखन-लघुलेखन परीक्षार्थ्यांकडून स्वयंघोषणापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:39+5:302021-02-05T05:25:39+5:30
जिल्ह्यात १० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर संस्था लॉग-इनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ...

टंकलेखन-लघुलेखन परीक्षार्थ्यांकडून स्वयंघोषणापत्र
जिल्ह्यात १० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर संस्था लॉग-इनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच परीक्षेसंदर्भातील सूचनाही देण्यात आल्या आहेत. ओळखपत्रात काही सुधारणा असल्यास संबंधित संस्थाचालकांनी (विद्यार्थ्यांचा फोटो व ओळखपत्रासह) समक्ष परीक्षा परिषदेच्या कार्यालयात येऊन प्रवेशपत्रावर सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि शिक्का घेतल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यांला परीक्षा देता येईल. परीक्षा सुरू झाल्यानंतर दुरुस्ती केली जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षेसाठी उमेदवारांकडून घेतल्या जाणाऱ्या स्वयंघोषणापत्राचा नमुनाही परिषदेने प्रसिद्ध केला आहे. त्यात स्वेच्छेने परीक्षा देत असून मला करोनाची लागण झालेली नाही किंवा कोरोनासदृश लक्षणेही नाहीत. मला कोरोनाची लागण झाल्यास त्यापोटी येणारा वैद्यकीय खर्च देण्यास परीक्षा परिषद बांधील नसल्याचे घोषणापत्र उमेदवाराला द्यावे लागणार आहे.