स्वत:वरील आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

By Admin | Updated: October 18, 2015 00:38 IST2015-10-18T00:38:47+5:302015-10-18T00:38:47+5:30

मी अमरावतीमधूनच संस्काराचे धडे घेतले. निल आर्मस्ट्राँग यांच्याकडे बघून माझे भविष्यातील स्वप्न पूर्ण केले.

Self confidence is the key to success | स्वत:वरील आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

स्वत:वरील आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

सुवर्ण महोत्सव : दिनेश केसकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
बडनेरा : 'मी अमरावतीमधूनच संस्काराचे धडे घेतले. निल आर्मस्ट्राँग यांच्याकडे बघून माझे भविष्यातील स्वप्न पूर्ण केले. कठोर परिश्रम व ध्येयवेड असल्याशिवाय जीवनात यश मिळत नाही. स्वत:वरील आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन बोईंग विमान कंपनीचे आशिया खंडाचे अध्यक्ष दिनेश केसकर यांनी केले. त्यानंतर त्यांनी दिलखुलासपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तांत्रिक समूहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून विनय गोहाड, युवराजसिंग चौधरी, पंकज देशमुख, हेमंत देशमुख, नितीन हिवसे, ए.पी. बोडखे, एम.एस.अली, आर.एम.देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य अली यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश व संस्थेविषयी माहिती दिली. यावेळी अली यांनी उपस्थित दिनेश केसकर यांचा परिचय दिला. त्यांच्या यशस्वी जीवनाची व्याख्या सांगितली. कार्यक्रमाला परसिस्टंस नागपूरचे सीईओ समीर बेंद्रे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज केली.
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नेमके काय करायला हवे याबाबत त्यांनी योग्य पध्दतीने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुध्दा त्यांच्या प्रश्नांचे समाधान करून घेतले.
समारंभानंतर आयईटीसी सेलच्या प्रमुख प्रिती खोडके यांनी माहिती दिली. व मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेल्या यशाबद्यल सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी केसकर यांचेशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. संचालन प्रतीक्षा नवाडे, आभार प्रदर्शन प्राचार्य ए.पी. बोडखे यांनी केले. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Self confidence is the key to success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.