देशातील 5G लॅब प्रकल्पाअंर्तगत अमरावती येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2023 19:10 IST2023-10-26T19:10:08+5:302023-10-26T19:10:17+5:30
संपूर्ण देशात एकमेव औषधनिर्माणशास्त्र विभागातून निवड केलेले महाविद्यालय आहे.

देशातील 5G लॅब प्रकल्पाअंर्तगत अमरावती येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची निवड
मनीष तसरे
अमरावती : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेला देशातील 5G लॅब प्रकल्पाअंर्तगत अमरावती येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची निवड झाली आहे. संपूर्ण देशात एकमेव औषधनिर्माणशास्त्र विभागातून निवड केलेले महाविद्यालय आहे.
या प्रकल्पाअंर्तगत येणाऱ्या संपुर्ण देशातील 5G लॅब चे उद्घाटन सोहळा व्हिडीओ कॉन्फसरींग व्दारे शुक्रवारी सकाळी ८ ते १२ दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते एकाच वेळी होत आहे.सदरील उदघाटन सोहळयाचे लाईव्ह प्रेक्षपण कार्यक्रम या संस्थेमार्फत संस्थेच्या सभागृहामध्ये व अभियांत्रीकी महाविद्यालय, अमरावती येथील सिव्हील AV हॉलमध्ये आयोजीत केला आहे.अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.खडबडी यांनी दिली.