जलयुक्त शिवार अभियानासाठी तालुक्यातील २३ गावांची निवड
By Admin | Updated: August 19, 2016 00:20 IST2016-08-19T00:20:13+5:302016-08-19T00:20:13+5:30
जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ अंतर्गत लघुसिंचन यंत्रणे मार्फत मांजरी म्हसला येथे साखळी बांध व खोलीकरण करण्यात आले.

जलयुक्त शिवार अभियानासाठी तालुक्यातील २३ गावांची निवड
नियोजन : वीरेंद्र जगतापांनी केले सिमेंट बांधातील जलपूजन
नांदगाव खंडेश्वर : जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ अंतर्गत लघुसिंचन यंत्रणे मार्फत मांजरी म्हसला येथे साखळी बांध व खोलीकरण करण्यात आले. येथील जलपूजन आ.वीरेंद्र जगताप यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.
या तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवारासाठी २३ गावांची निवड करण्यात आली असून ही गावे शंभर टक्के जलयुक्त होण्याच्या दृष्टीने आराखडे तयार करण्यात आले आहेत. या गावांकरिता लागणाऱ्या पाण्याची क्षमता व एकूण गरज लक्षात घेऊन पडणारा पाऊस विविध उपक्रमाद्वारे अडविण्याचे नियोजन या आराखड्याते केले आहे.
जलयुक्त शिवार अभियान उपक्रमाद्वारे पाणी टंचाई मुक्त गांव होण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणेचा सहभाग राहणार आहे. लघुसिंचन पाटबंधारे विभागामार्फत एकाच नाल्यावर, साखळी सिंमेट बंधाऱ्याची कामे करण्यात आला आहे. यामुळे येथील शिवारांतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली.
या जलपूजनप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खर्चान, तहशीलदार बी.व्ही. वाहूरवाघ, तालुका कृषी अधिकारी निमजे, कृषी सहायक संतोष खासबागे, सचिन गुल्हाने, संतोष चव्हाण, भीमराव राऊत, शरद वासनिक, प्रफुल्ल बेलसरे, रवी गारोडे, पंकज पवार, सुधीर चव्हाण, ललित चव्हाण, चेतन केळकर, गजानन उईके, अरुण केचे, सुधीर गणथळे, वासुदेव तुमसरे, सागर उईके, किसन उईके, निरंजन वानखडे व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)