१० पंचायत समिती सभापतींची निवड मंगळवारी

By Admin | Updated: March 13, 2017 00:04 IST2017-03-13T00:04:18+5:302017-03-13T00:04:18+5:30

जिल्हा परिषदेंतर्गत पंचायत समितीच्या सभापतीपदाची मुदत १३ मार्च रोजी संपत असल्यामुळे ...

Selection of 10 Panchayat Samiti Chairmen on Tuesday | १० पंचायत समिती सभापतींची निवड मंगळवारी

१० पंचायत समिती सभापतींची निवड मंगळवारी

हालचालींना वेग : सभापती, उपसभापतीसाठी फिल्डिंग
अमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत पंचायत समितीच्या सभापतीपदाची मुदत १३ मार्च रोजी संपत असल्यामुळे जिल्ह्यातील १० पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक मंगळवार १४ मार्च रोजी होणार आहे. ही निवड पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर आता सभापती व उपसभापती कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १३ मार्च रोजी विद्यमान सभापतींची यासर्व निवडणुका संबंधित पंचायत समितींच्या सभागृहात होणार आहेत. ही निवडप्रक्रिया सभापतींच्या आरक्षणानुसार पार पडेल.
यानिवडणुकीत बहुमत न मिळालेल्या पंचायत समितीमध्ये समीकरणे जुळविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये काथ्याकुट करण्यात येत असून काही ठिकाणी अभद्र युती होण्याची शक्यता आहे. २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेत तर १४ मार्च रोजी पंचायत समितीत सत्तेची स्थापना होईल. सगळीकडे धूळवडीची रंगत असली तरी राजकीय वर्तुळात मात्र पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगाने घडत आहेत. सभापतीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, यासाठी रणनिती आखली जात आहे.
पाच ठिकाणी काँग्रेसची सत्ता
अमरावती : काही पंचायत समितींवर काँग्रेसची सत्ता स्थापन होणार असल्याचे चित्र निवडणूक निकालातून दिसून आले. पाच पंचायत समितींचा अपवाद वगळता इतर ५ पंचायत समितीत मात्र एका पक्षाला बहुमत नसल्याने तडजोडीचे राजकारण होणार आहे. त्यामुळे पंचायत समिती निवडणूक रंगतदार होईल. (प्रतिनिधी)
१० पंचायत समितीपैकी पाच ठिकाणी काँग्रेसची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे तर इतर पाच ठिकाणी राजकीय चित्र कसे असेल, याबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत. सध्या काँग्रेस पक्षाला चिखलदरा पंचायत समितीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. याशिवाय चार ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून आघाडीची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये दर्यापूर, अचलपूर, वरूड आणि अमरावती पंचायत समितीचा समावेश आहे. चांदूर बाजारमध्ये मात्र प्रहारची सत्ता येणार आहे. काही ठिकाणी भाजप-शिवसेना मिळून युतीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अभ्रद्र युतीचेही संकेत मिळत आहेत.

Web Title: Selection of 10 Panchayat Samiti Chairmen on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.