Seizure of Rs 6.5 lakh from burglary accused | घरफोडीच्या आरोपीकडून साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडीच्या आरोपीकडून साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

अमरावती : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अन्सारनगरवाडीतून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल १३ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली मिळाली असून, त्याच्या ताब्यातून साडेचार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व दीड लाख नगदी असा एकूण ६ लाख ३८ हजार १६४ रुपयाचा मुद्देमाल नागपुरीगेट पोलिसानी जप्त केला. ही कारवाई १२ जानेवारी रोजी करण्यात आली होती.

जब्बार खान रऊफ खान (२२, रा. अन्सारनगरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला नागपुरीगेट पोलिसानी पोलिसी खाक्या दाखविला असता, त्याने नागपुरीगेट हद्दीत ११ तर गाडगेनगर ठाणे हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ४,७७,१६४ रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने, १,४१,००० रुपये नगदी, २० हजाराची गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ६,३८,१६४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह, उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव, एसीपी धुमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, पीएसआय प्रशांत लभाने, एएसआय विलास पोवळेकर, प्रमोेद गुडधे, बबलू येवतीकर, अकील खान, विक्रम देशमुख, संजय भारसाकळे, चालक सफअर अली, मनोज यादव, संजय पवार यांच्या पथकाने केली.

Web Title: Seizure of Rs 6.5 lakh from burglary accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.