सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:55+5:302021-01-08T04:36:55+5:30
पोलीस सूत्रांनुसार, श्रीकृष्ण नत्थुजी वाहूरवाघ (५५, रा. हरिओम कॉलनी) यांच्या घराचा मागील दार तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख ...

सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त
पोलीस सूत्रांनुसार, श्रीकृष्ण नत्थुजी वाहूरवाघ (५५, रा. हरिओम कॉलनी) यांच्या घराचा मागील दार तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपये असा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविचे कलम ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्यात यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ९ लाख ५० हजारांचे १९० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख ६० हजार रुपये, गुन्हयात वापरलेले सहा लाखांचे चारचाकी वाहन (एमएच २७ एसी ३७६३) असा १६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौथा आरोपी पवन प्रवीण पवार (२५, रा. तिरुमला कॉलनी) हा कोरोना पॉझीटिव्ह निघाला. ५ जानेवारी रोजी डिस्चार्ज होताच त्याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून ९२.९६० ग्रॅम वजनाचे ४ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने, रोख १० हजार ४०० रुपये तसेच चोरीनंतर खरेदी केलेले ३७ हजारांची दुचाकी असा एकूण ५ लाख ३७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आतापर्यंत या गुन्ह्यात १४ लाख ४० हजारांचे २८२.९६० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख ७० हजार ४०० रुपये, चारचाकी वाहन व एक दुचाकी असा एकूण २१ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राजकिरण येवले, नरेशकुमार मुंढे, हवालदार जावेद समद, पोलीस नायक इजाज शाह, कॉन्स्टेबल दिनेश नांदे पुढील तपास करीत आहेत.