शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

पाच कोटींचे बियाणे मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला.

ठळक मुद्देसोयाबीनची दैना : महाबीजसह अन्य कंपन्यांनी लावली शेतकऱ्यांची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उगवणशक्ती नसलेले वांझोटे बियाणे महाबीजसह इतर कंपन्यांनी माथी मारल्याने शेतकऱ्यांना २० हजार हेक्टरमध्ये किमान पाच कोटींचा फटका बसला आहे. पेरणीच्या काळात आरिष्ट ओढवल्याने तातडीने नुकसानभरपाई किंवा पर्यायी बियाणे देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.रोहिणीत मान्सूनपूर्व सरी व लगेच मृगधारा कोसळल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण पसरले होते. हवामान खात्यासह स्कायमेटनेदेखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला व जिल्ह्यासह विदर्भात मान्सून आल्याची सुखद वार्ता दिली. त्यामुळे पेरणीचा जोम वाढला. कमी पावसात, कमी दिवसांत येणारे कॅश क्राप या अर्थाने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या ९३०५ या वाणाची पेरणी केली. यामध्ये बहुतांश क्षेत्रातील सोयाबीन उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला. पाच कोटींचे बियाणे मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीनंतर कृषी विभागाद्वारे क्षेत्रभेटी व तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू झालेली आहे. या प्रक्रियेनंतर कंपन्यांद्वारे बियाणे मिळणार की यासाठी ग्राहक मंच्याकडे दाद मागावी लागणार, हा प्रश्न कायम आहे.महाबीजची ३० किलोची सोयाबीन बियाण्यांची बॅग ही २३४० रुपये या दराने विकली जाते. एका एकराला साधारणपणे एक बॅग बियाणे लागतेच. या अंदाजाने जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ ते २० हजार बॅग बियाणे मातीमोल झाल्याने शेतकºयांचे साधारणपणे पाच कोटींचे नुकसान झाले आहे.तालुका समितीच्या अहवालाकडे लक्षशेतकºयांच्या बियाण्यासंदर्भात तक्रारी असतात. त्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी अध्यक्ष व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सदस्य सचिव असलेली सात सदस्यीय समिती असते. या समितीत कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, विक्री केंद्राचा संचालक, तालुका कृषी अधिकारी व बियाणे कंपनीचा प्रतिनिधी असतो. या समितीद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारीची शहानिशा करण्यात येते. यामध्ये बियाणे सदोष असल्यास तडजोड किंवा कंपन्या दाद देत नसल्यास शेतकऱ्यांना ग्राहक मंचाचा पर्याय उपलब्ध आहे.उगवण न होण्याची प्रामुख्याने तीन कारणे आहेत. यासंदर्भात प्राप्त तक्रारींची तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू आहे. यामध्ये बियाणे सदोष निघाल्यास बियाणे कंपन्यांकडून परताव्यासाठी प्रयत्न करू.- विजय चवाळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती