आता जूनअखेरपर्यंत सुरक्षा कवच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST2021-05-16T04:12:25+5:302021-05-16T04:12:25+5:30
अमरावती : कोविड-१९ शी संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह लागू ...

आता जूनअखेरपर्यंत सुरक्षा कवच !
अमरावती : कोविड-१९ शी संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह लागू करण्याच्या योजनेला आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी २०२१ पासून मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही हे अर्थसहाय्य मिळू शकणार आहे.
हे सानुग्रह सहाय्य लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने २९ मे २०२० च्या अध्यादेशाद्वारे घेतला होता. ३० सप्टेंबरपर्यंत लागू असलेल्या या निर्णयाला नंतर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या मृत्यूची प्रकरणे वित्त विभागाच्या संमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती. मात्र, राज्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून कोविड-१९चा प्रादुर्भाव अधिकच वाढला असून, मृत्यूची संख्या वाढली आहेत. यात नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती विचारात घेऊन शासनाने या सानुग्रह योजनेला १ जानेवारी २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे वित्त विभागाने १४ मे रोजी या संदर्भात आदेश जारी केला आहे. कोरोना काळात सर्वेक्षण शोध, चाचणी, उपचार व मदतकार्य यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावताना शासनाच्या विविध विभांगातील विविध प्रवर्गातील कर्मचाऱ्यायांचा जवळून संबंध येतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ८ मार्च २०२० रोजी काढलेल्या आदेशानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना कवच लागू केला आहे. मात्र, आरोग्य कर्मचारी अतिरिक्त जिल्हा प्रशासन, पोलीस होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी लेखा व कोषागार, अन्न व नागरी पुरवठा पाणी पुरवठा व स्वच्छता घरोघरी जाऊन सर्वेक्षण यासाठी नेमलेल्या विभागाचे कर्मचारीही संबंधित कर्तव्य पार पाडतात. अशा कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम राहिले, यासाठी राज्य शासनाने यांनाही ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय घेतला.