शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

बंदुकांच्या सुरक्षेत चोरांना आणले अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:58 AM

मै भी जिंदा नही जाता... आप भी नही जाओगे... अशा धमक्या देणाऱ्या सुवर्णलंकार चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बंदुकांच्या सुरक्षेत जालना ते अमरावतीपर्यंत आणले. तीनही आरोपींना अमरावतीत आणताना पोलिसांना डोळ्यात तेल घालून प्रवास करावा लागला.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मै भी जिंदा नही जाता... आप भी नही जाओगे... अशा धमक्या देणाऱ्या सुवर्णलंकार चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बंदुकांच्या सुरक्षेत जालना ते अमरावतीपर्यंत आणले. तीनही आरोपींना अमरावतीत आणताना पोलिसांना डोळ्यात तेल घालून प्रवास करावा लागला. परतवाडा येथील सुवर्णलंकार प्रतिष्ठानांना लक्ष करणाºया या राज्यस्तरीय टोळीकडून पोलिसांनी ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विजयसिंग कृष्णसिंग भादा (३५), संजुसिंग कृष्णसिंग भादा (२८, दोन्ही रा. गुरुगोविंदनगर, जालना) व सुंदरसिंग सुखलालसिंग राजपूत (२२,रा.लोधी मोहल्ला, जालना) अशी आरोपींची नावे आहेत.परतवाडा हद्दीतील ईश्वर पन्नालाल अग्रवाल यांच्या सोन्याच्या दुकानातून २५ आॅगस्ट रोजी चोरांनी ७८ लाखांचे दागिने लंपास केले होते. या घटनेच्या तक्रारीनंतर अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पथके तयार करण्यात आली. शिकलकरी समाजाची टोळी या चोरीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातच आरोपींनी गुन्ह्यात एक कार व दुचाकीचा उपयोग केल्याची माहिती पुढे आली होती. अमरावती शहरातील अ‍ॅकेडमी हायस्कूलच्या प्रांगणात एक कार बेवारस स्थितीत आढळली होती. त्याच कारचा आरोपींनी गुन्ह्यात वापर केल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पोलीस पथके सर्व बाजूने तपास करून आरोपींच्या ठिकाणाचा पत्ता लावला. आरोपी जालन्याचे असल्याचे माहिती होताच पोलिसांची पथके जालनाकडे रवाना झाली. पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा १८ जणांच्या पथकाने जालन्यात तळ ठोकला. आरोपींबद्दल सर्व माहिती काढून तीनही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्या आरोपींना बुधवारी अमरावतीत आणले गेले. तीनही आरोपींना पुढील तपासकामी परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.जालन्यातील गुरुगोविंदनगर अतिसंवेदनशीलजालना येथील गुरुगोविंदनगर व लोधीत राहणाºया या आरोपींचा परिसर अत्यंत संवेदनशील असल्याचे पोलिसांना लक्षात आले. मात्र, पोलिसांनी धाडसी वृत्तीने दोन्ही परिसरात तीन दिवस रेकी केली. तीनही आरोपींना सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या पथकाने ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला. आरोपींजवळ शस्त्र असण्याची शक्यता पाहून पोलिसांनी त्यांच्या अटकेची पूर्वतयारी केली. आरोपींच्या घराचा नकाशा तयार करून ते काय करू शकतात, यांचा अंदाज घेतला. त्यांच्या सर्व पळवाटांवर पोलिसांनी खडा पहारा ठेवला. त्यानंतर पोलिसांनी थेट आरोपींच्या घरावर धाडी टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी विजयसिंग याने पोलिसांना विरोध केला. मेरे को कैसे लेके जाते, असे भाष्य त्याने पोलिसांसोबत केले. रागाच्या भरात त्याने परिसरात उभी असलेली कार दोन्ही हाताने उचलून विरोधात्मक प्रदर्शन केले. आरोपींच्या अशा कृत्यामुळे ते पोलिसांशी संघर्ष करू शकत होते. ही बाब लक्षात घेता पोलिसांना त्या कुख्यात आरोपींना जालना ते अमरावतीपर्यंत बंदुकीच्या धाकावर आणावे लागल्याचे पोलिसांनी सांगितले.चोरी केल्यानंतर आरोपी पोहोचले अमरावतीतचोरी केल्यानंतर रात्री ३ वाजता इंडिका कारने ते अमरावती येथे इतवाºयातील केजीएन ट्रेडर्सजवळ आले. तेथे त्यांचे वाहन नादुरुस्त झाल्याने ती कार त्यांनी तेथेच टाकून तेथून १०० मीटर पायी चालत गेले. तेथून एका आॅटोरिक्षाला थांबवून अमरावती बस स्थानकात सोडून मागितले. सकाळी ५.३० च्या एसटीने जालन्याला निघाले. अमरावती एलसीबीने सीसीटीव्हीवरून आॅटोरिक्षाचा शोध घेतला. त्याच्याकडून माहिती काढून पोलिसांनी जालना गाठले. तेथील लोधीपुरा भागातील गुरू गोविंदसिंगनगर भागातून त्यांना पहाटे ५ वाजता ताब्यात घेण्यात आले. सकाळी ९.३० वाजता पोलीस पथक या दरोडेखोरांना घेऊन अमरावतीत आले. या टोळीने चांदूर बाजार येथेही दरोडा घातल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे.आरोपी सुंदरने केली परतवाड्यात 'रेकी'आरोपी सुंदरसिंग सुकलालसिंग राजपूत (३०) याचे वडील मूळचे परतवाडा येथील असून, ते लालपुलाजवळ राहतात. घटनेच्या एक दिवसांपूर्वी सुंदर हा वडिलांकडे थांबला. तेथून त्याने परतवाड्यातील सोन्याच्या दुकानांची 'रेकी' केल्याचे तपासातून पुढे आले.

टॅग्स :Thiefचोर