सुरक्षा यंत्रणेने नेमाणी गोदाम पिंजून काढले
By Admin | Updated: May 15, 2014 23:05 IST2014-05-15T23:05:43+5:302014-05-15T23:05:43+5:30
सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने शुक्रवारी १६ मे रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामात मतमोजणी होणार

सुरक्षा यंत्रणेने नेमाणी गोदाम पिंजून काढले
अमरावती : सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने शुक्रवारी १६ मे रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामात मतमोजणी होणार असल्याने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणेने गुरुवारी हा परिसर पिंजून काढला. त्याकरिता बॉम्ब शोधक-नाशक पथकाने ‘तेजा’ श्वानाची मदत घेतली. ‘तेजा’चे सहकार्यही मोलाचे ठरले. घातपातविरोधी तपासणीकरिता लागणार्या एकुणच साहित्याचा बॉम्बशोधक-नाशक पथकाने वापर केला. पोलीस निरीक्षक भगत, परदेशी, गाडेकर, दलाल, गवई, नितीन, किरण हे कर्मचारी पथकात सहभागी होते. (प्रतिनिधी) १0 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आटोपताच नेमाणी गोदामात मत यंत्रे (ईव्हीएम) कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली. मेळघाट, तिवसा, बडनेरा, दर्यापूर, अमरावती, अचलपूर विधानसभा मतदार संघनिहाय ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. सहा मतदारसंघातील ईव्हीएम या तीन गोदामात सुरक्षित असून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आले होते. प्रत्येक गोदामाच्या द्वारालगत अग्निशामक यंत्रे बसविण्यात आली आहेत. नेमाणी गोदामाच्या मुख्य प्रवेशद्वाराशिवाय मागील बाजूला सुरक्षा मनोरे उभारण्यात आले होते. या मनोर्यांवरून सुरक्षा रक्षक दुर्बिणीद्वारे बारीकसारीक हालचाली टिपत होते. तब्बल ३५ दिवसानंतर मतमोजणीची प्रक्रिया राबविली जात असल्याने पोलीस उपायुक्त बी.के.गावराने यांच्या मार्गदर्शनात गुरूवारी नेमाणी गोदाम परिसराची सुरक्षा यंत्रणेने बारकाईने तपासणी केली. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या गोदामाच्या बाह्य भागाची डीएसएमडी (जमिनीच्या आत पेरून ठेवलेले घातपात करणारे साहित्याने शोधून काढणारे यंत्र) तपासणी करण्यात आली. या गोदामाच्या संरक्षण कुंपण परिसरालाही बॉम्बशोधक-नाशक पथकाने बारकाईने तपासणी केली. यामध्ये श्वान