छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्रय व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:42+5:30

अमरावती शहरात छुप्या मार्गाने चालणाऱ्या देहविक्रय व्यवसाय आता हायप्रोफाइल झाला आहे. प्रतिष्ठित परिसरातील फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन हा गोरखधंदा काही ठिकाणी सुरू आहे. फोन कॉलवर ग्राहकांशी बोलणे आणि निश्चित ठिकाणी बोलावणे, असे प्रकार शहरात सुरू आहेत. गजबलेल्या परिसरातही देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Secrets of the business are evolving in a secret way | छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्रय व्यवसाय

छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्रय व्यवसाय

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात छुप्या मार्गाने देहविक्रय व्यवसाय फोफावत आहे. हा प्रकार अंबानगरीच्या संस्कृतीला गालबोट लावणारा आहे. विद्याविहार कॉलनीतील देहविक्रय अड्ड्याचा नुकताच नागरिकांनी पर्दाफाश केला. मात्र, पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. परिसरातील महिलांची कुचंबणा करणारा हा अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावा, या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती.
अमरावती शहरात छुप्या मार्गाने चालणाऱ्या देहविक्रय व्यवसाय आता हायप्रोफाइल झाला आहे. प्रतिष्ठित परिसरातील फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन हा गोरखधंदा काही ठिकाणी सुरू आहे. फोन कॉलवर ग्राहकांशी बोलणे आणि निश्चित ठिकाणी बोलावणे, असे प्रकार शहरात सुरू आहेत. गजबलेल्या परिसरातही देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
काही महिन्यांपूर्वी अर्जुननगर परिसरातील अड्ड्याचा पदार्फाश झाला होता. त्यापूर्वी अंबाविहार येथे खुलेआम चालणाºया या व्यवसायाला नागरिकांनी प्रचंड विरोध केला होता. विद्याविहार कॉलनीतील एका घरात गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार होत असल्याची ओरड नागरिकांची आहे. शहरात देहविक्रय व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत असला तरी यावर पोलिसांचे अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात अनैतिक देह व्यापार अधिनियम, अनैतिक रहदारी (प्रतिबंध) कायद्यान्वये ( पीटा अ‍ॅक्ट) करावयाच्या कारवाईसाठी किचकट प्रक्रियेमुळे पोलीसही धजावत नाहीत.

हायप्रोफाइल रॅकेट

मसाज सेंटरच्या नावाखाली गैरप्रकार
शहरातील काही ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली काही गैरप्रकार चालत असल्याची चर्चा सुरू आहे. पुरुषांची मसाज करून देण्यासाठी महिलांचा वापर केला जात असल्याची सबबीखाली दारे लावली जातात. बंद खोलीत काय घडते, हे उघड केले जात नाही. तथापि, हे प्रमाण अद्याप मर्यादितच असल्याचे सांगितले जात आहे.

हायप्रोफाइल सेक्स रॅकेट
सक्रिय; तरुणाची फसवणूक

देहविक्रय व्यवसाय आता हायटेक झाला असून, अनेकांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश व कॉल सुरू झाले आहेत. नुकताच शहरातील एका तरुणाच्या मोबाइलवर एका मुलीने कॉल केला. महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून पैसे कमाविण्याचे आमिष त्याला दिले. वेगवेगळ्या महिलांशी लैंगिक संबंध व पैसा मिळण्याच्या अपेक्षेने हुरळून गेलेल्या त्या तरुणानादेखील मोबाईल कॉलला प्रतिसाद दिला. ‘वन नाइट स्टे’चे १५ हजार रुपये मिळतील, असे सांगून त्या तरुणाकडून नोंदणीचे १५०० रुपये तर डिपॉझिट ३० हजार रुपये एका बॅक खात्यात आॅनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने पैसे पाठविले. त्यानंतर पुन्हा मुलीचा फोन आला आणि इर्विन चौकात येत असलेल्या मुलीशी भेटायला सांगण्यात आले. तो तरुण इर्विन चौकात पोहोचला. यादरम्यान त्याला पुन्हा कॉल आला आणि आणखी पैशांची मागणी झाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या निदर्शनास आले. या घटनेची तक्रार घेऊन तो तरुण सायबर ठाण्यात पोहोचला होता.

समाज माध्यमावर
गुपचूप ‘रेट कार्ड’

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइलच्या माध्यमातून देहविक्रय व्यावसायिक किंवा दलाल ग्राहकांशी संवाद साधतात. लब्धप्रतिष्ठित व्यक्तीच्या मोबाइलवर मुलींची छायाचित्रेच नव्हे, रेट कार्डसुद्धा पाठविले जाते. मोबाइलवर संवाद साधून जागा व वेळ निश्चित केली जाते. त्यामुळे या गैरप्रकाराची वाच्यता सार्वजनिकरीत्या होत नाही. सोशल मीडियाच्या अशा वापरातून हा व्यवसाय फोफावल्याचे अनेक बड्या शहरांमध्ये उघड झाले. त्याचे लोण अमरावतीतदेखील बऱ्याच खोलवर पसरले आहे.

२०१६ मध्ये पीटा अ‍ॅक्टची शहरात कारवाई
अमरावती शहरातील व्हीएमव्ही परिसरात २०१६ मध्ये देहविक्रय व्यवसायाविरुद्ध पीटा अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती विधी सूत्रांनी दिली आहे. दलालमार्फत मुली पुरविणे, देहविक्रीसाठी जागा उपलब्ध करणे व ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.

मुली डेट देण्यासाठी कॉल करतात. ‘मुलींशी सेक्स करा आणि पैसे कमवा’ असे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केली जाते, अशी एक तक्रार प्राप्त झाली आहे. हा एकाप्रकारे ऑनलाइन फ्रॉडच आहे. तरुणांनी अशा आमिषाला बळी पडू नये.
- विशाल काळे, पोलीस निरीक्षक, सायबर ठाणे.

Web Title: Secrets of the business are evolving in a secret way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.