सचिवपुत्र अजिंक्य गोसावीला अखेर अटक
By Admin | Updated: December 27, 2014 22:42 IST2014-12-27T22:42:18+5:302014-12-27T22:42:18+5:30
तपोवनच्या बालगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी पदावनत संस्था सचिव श्रीराम गोसावीचा मुलगा अजिंक्य ऊर्फ सोनू याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी उशिरा अटक केली. न्यायालयाने

सचिवपुत्र अजिंक्य गोसावीला अखेर अटक
‘तपोवन’ बालगृहातील अत्याचार प्रकरण : आणखी काहींवर कारवाईची टांगती तलवार
अमरावती : तपोवनच्या बालगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी पदावनत संस्था सचिव श्रीराम गोसावीचा मुलगा अजिंक्य ऊर्फ सोनू याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी उशिरा अटक केली. न्यायालयाने त्याला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘लोकमत’ने सचिवपुत्र अजिंक्य गोसावीच्या कृत्यांबाबतचे वृत्त पुराव्यानिशी प्रसिध्द केले होते, हे येथे उल्लेखनीय.
काही दिवसांपूर्वी तपोवन येथील मुलींच्या वसतिगृहातील दोन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघड होताच शहरात खळबळ उडाली. पीडित मुलींनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी नारायण कोठेवार, प्रदीप खंडारे या नराधमांना अटक केली होती. त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी गजानन चुटे व श्रीराम गोसावी यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान पोलिसांसमोर अनेक तथ्यांचा उलगडा झाला. पोलिसांनी बालगृहाबाहेर लावलेल्या तक्रारपेटीत मुलींच्या डझनांनी तक्रारी प्राप्त झाल्यात. त्याअनुषंगाने तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक केली.
मुलींनी तक्रारींमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची सविस्तर माहिती दिली होती. काही मुलींनी तर अजिंक्य गोसावीविरुद्ध तक्रार केली होती. शुक्रवारी पुन्हा एका पीडित मुलीने अजिंक्य गोसावीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर अजिंक्य गोसावीला अटक करण्यात आली. जुलै २०१२ ते जुन २०१४ च्या दरम्यान मुलींना धमकावणे व छेडखानी सोबतच, मुलीच्या पुस्तकांवर अश्लिल एसएमएस लिहत होता.