लेहगावात इसमावर गुप्तीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST2021-07-14T04:16:03+5:302021-07-14T04:16:03+5:30

दर्यापूर : बांधकामाच्या कारणावरून इसमावर गुप्तीने वार करून जखमी केल्याची घटना दर्यापूर ठाण्याच्या हद्दीतील लेहगाव येथे रविवारी घडली. योगेश ...

Secret attack on Isma in Lehgaon | लेहगावात इसमावर गुप्तीने वार

लेहगावात इसमावर गुप्तीने वार

दर्यापूर : बांधकामाच्या कारणावरून इसमावर गुप्तीने वार करून जखमी केल्याची घटना दर्यापूर ठाण्याच्या हद्दीतील लेहगाव येथे रविवारी घडली. योगेश किसनराव श्रीनाथ ( रा. लेहगाव) असे आरोपीचे नाव आहे. रामराव महादेवराव कोइंगे ( रा. लेहगाव) यांनी तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-------------------------------------------

शिवीगाळ करून कानशिलात लगावली

अमरावती : क्षुल्लक कारणावरून शुभम भागवत यांना शिवीगाळ करून त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना तळेगाव दशासर ठाणे हद्दीतील तिवरा येथे रविवारी घडली. आरोपी अविनाश बबन गिरी, अक्षय बबन गिरी, आकाश बबन गिरी, बबन देवगिर गिरी (सर्व रा. तिवरा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी शुभम दिलीप भागवत यांनी तक्रार नोंदविली. फिर्यादीच्या मोठ्या वडिलांच्या कानशिलात लगावली तर फिर्यादीला सुद्धा काठीने मारहाण केली.

----------------

निधन

फोटो -

पुरुषोत्तम इखार

अमरावती : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचेनिवृतत्त सहायक कल्याण आयुक्त पुरुषोत्तम इखार (६८) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यट्च्या पश्चात पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Secret attack on Isma in Lehgaon