घरकूलचा दुसरा टप्पा लाभार्थ्यांच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:31+5:302021-02-05T05:22:31+5:30
चांदुर रेल्वे : पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. याबाबत मागील महिन्यात ...

घरकूलचा दुसरा टप्पा लाभार्थ्यांच्या खात्यात
चांदुर रेल्वे : पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. याबाबत मागील महिन्यात आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलानाला सामोरे जात असताना, झालेल्या १ तारखेपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करणार, नाहीतर राजीनामा देऊ, असे वक्तव्य नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी यांनी केले होते. त्या आश्वासनाची पूर्तता आपण केली असून, शहरातील लाभार्थ्यांच्या खात्यात घरकूल निधीचा दुसरा टप्पा पोहोचल्याचे नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरात एकूण २१५ घरकुले मंजूर असून, त्या सर्वांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला, तर दुसऱ्या टप्प्याला कोरोनामुळे उशीर झाला. दुसऱ्या टप्प्याचा निधी आणण्यास माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रयत्नाने नगरपरिषदेला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. घरकुलाचा दुसरा हप्ता म्हणून पालिकेला १ कोटी २६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. दोन दिवसांत उर्वरित लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी मेघना वासनकर, नप शिक्षण सभापती महेश कलावटे उपस्थित होते.