लेखा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस
By Admin | Updated: September 17, 2015 00:14 IST2015-09-17T00:14:16+5:302015-09-17T00:14:16+5:30
इंदिरा आवास योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम १५ सप्टेंबरपासून अन्याय केल्याच्या निषेधार्थ काम बंद ...

लेखा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस
अन्याय : पंचायत समितीतील कामकाज ठप्प
अमरावती : इंदिरा आवास योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम १५ सप्टेंबरपासून अन्याय केल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन दोन दिवसांपासून सुरू आहे. यामुळे कामकाज प्रभावीत झाले आहे.
जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात गटस्तरावर सहायक लेखा अधिकारी यांना स्वाक्षरीदार प्राधिकृत (डिजिटल सिग्नीचर) करण्यास विरोध असून एकतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडील व्यपगत केलेली कनिष्ठ लेखाअधिकारी संवर्गाची पदे पुनर्जिवित करण्यात यावी, तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकरिता सहायक लेखा अधिकारी या संवर्गाची पदे कंत्राटी पध्दतीने भरून लेखा कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे, तो दूर करावा या मागण्यांसाठी मंगळवार १५ सप्टेंबरपासून इंदिरा आवास व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम बंदचा निर्णय लेखा कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात १४ पंचायत समितीमधील सुमारे ५६ कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असल्याचे लेखा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष पंचगाम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)