१७ उमेदवारांचे भाग्य सील

By Admin | Updated: June 21, 2014 01:11 IST2014-06-21T01:11:37+5:302014-06-21T01:11:37+5:30

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शुक्रवारी १७ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे.

Season 17 fate of the candidates | १७ उमेदवारांचे भाग्य सील

१७ उमेदवारांचे भाग्य सील

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शुक्रवारी १७ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. २४ जून रोजी मतमोजणीनंतरच नवा शिक्षक आमदार कोण? हे स्पष्ट होईल.
अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यातील ४४ हजार ४८८ पैकी २७ हजार ८०३ शिक्षक मतदारांनी निवडणुकीत सहभाग नोंदविला. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत ७१ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत केवळ १३.७० टक्के इतकेच मतदान झाले. त्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ३१.८३ तर दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४९.०१ तर शेवटची मतदानाची टक्केवारी ६२.५०. एवढी राहिली.
मतप्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण
अमरावती : मतदान प्रक्रियेदरम्यान ७१ केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात १६ हजार ३६५ मतदानापैकी ८ हजार ९७४ मतदान झाले आहे. अकोला येथे ७६६५ पैकी ५०५१, वाशीम येथे ४३१० पैकी २९३८, बुलडाणा येथे ७७९३ पैकी ५५३६ तर यवतमाळ येथे ८३५५ पैकी ५३०४ एवढे मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान हे अमरावतीत ५४.८४ टक्के तर सर्वात जास्त मतदान बुलडाणा येथे ७१.०४ टक्के झाले आहे.
या निवडणुकीत एकूण ६२.५० टक्के मतदान झाले आहे. ४४ हजार ४८८ मतदारापैकी २७ हजार ८०३ एवढे मतदान झाले आहे. यात २२ हजार २९२ पुरुष तर ५५११ स्त्री मतदारांचा समावेश आहे. अमरावतीत सर्वात कमी तर बुलडाण्यात सर्वात जास्त मतदान झाल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार अमरावती येथील असल्याने अधिक चुरस वाढली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर लॅपटॉप
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत विभागातील ७१ केंद्रावर मतदार यादी शोधणे सुकर व्हावे, यासाठी प्रशासनाने लॅपटॉपची व्यवस्था केली होती. यादी क्रमांक, शिक्षक मतदारांची नावे, केंद्र क्रमांक यादी माहिती या लॅपटॉप मध्ये उपलब्ध होती. त्यामुळे मतदांराना केंद्रावर सहजतेने माहिती मिळाली.
या उमेदवारांचे भाग्य झाले सील
विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत १७ उमेदवारांचे भाग्य सील झाले आहे. यात शेखर भोयर, श्रीकृष्ण अवचार, श्रीकांत देशपांडे, वसंत खोटरे, अरुण शेळके, सुभाष गवई, वर्षा निकम, रामदास बारोटे, संतोष हुशे, विजय गुल्हाणे, नरहरी अर्डक, अजमल युसूफ खान,अहमद खान गुलाम अमानुल्ला खान, जयदीप देशमुख, सर्जेराव देशमुख, रविद्र मेंढे, प्रकाश तायडे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Season 17 fate of the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.