१९ नव्या हॉकर्स झोनवर शिक्कामोर्तब

By Admin | Updated: July 30, 2016 23:56 IST2016-07-30T23:56:26+5:302016-07-30T23:56:26+5:30

शहरातील विविध क्षेत्रात असलेल्या ४७ हॉकर्स झोनपैकी १९ हॉकर्स झोनवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Season 1 on the 19th New Hawker's Zones | १९ नव्या हॉकर्स झोनवर शिक्कामोर्तब

१९ नव्या हॉकर्स झोनवर शिक्कामोर्तब

 १२०० हॉकर्सची सोय : महापालिकेचा पुढाकार, फेरीवाल्यांना नोटीस
अमरावती : शहरातील विविध क्षेत्रात असलेल्या ४७ हॉकर्स झोनपैकी १९ हॉकर्स झोनवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या १९ ठिकाणी ७५८ फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मुभा राहील. तत्पूर्वी ११ घोषित हॉकर्स झोनमध्ये सुमारे ५०० फेरीवाल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निर्देशान्वये शहरात सर्वदूर अतिक्रमण निर्मूलन मोहीम चालविल्यानंतर फेरीवाल्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमण निर्मुलन मोहीम थांबवावी, यासाठी फेरीवाल्यांनी निदर्शनेसुध्दा केलीत. मात्र महापालिका प्रशासन कारवाईवर ठाम राहिले. त्याचवेळी निश्चित आणि प्रस्तावित हॉकर्स झोनमध्येच व्यवसाय करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. चर्चेदरम्यान नोंदणीबद्ध फेरीवाल्यांसाठी तब्बल ४७ नव्या जागा प्रस्तावित करण्यात आल्यात. त्यापैकी १९ जागांवर ७५८ फेरीवाल्यांना बसता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
सिमॅक प्रा. लि. कंपनीने केलेल्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणामध्ये चार हजारपेक्षा अधिक फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली. त्यापैकी १६५८ फेरीवाल्यांनी आवश्यक ते दस्तऐवज महापालिकेच्या बाजार व परवाना कार्यालयामध्ये संकलित केलेत. उर्वरीत फेरीवाल्यांसाठी वारंवार मुदतवाढही देण्यात आली. मात्र त्यानंतरही कागदपत्र जमा करण्यात न आल्याने नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठीच विविध परिसरात हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)

शहरातील या ठिकाणी बसू शकतील फेरीवाले
राजापेठ ते दस्तूरनगर रोडवरील विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालयालगतचा रस्ता, राजापेठ ते दस्तूरनगर रोडवरील स्वामी सतरामदास विद्यालयासमोरील रस्ता, दस्तूरनगर ते छत्रीतलाव रोडवरील राम-हनुमान मंदिरासमोरील रस्ता, अमरावती ते वलगाव मार्गे नवसारीलगत, अमरावती ते वलगावमार्गे विद्युुतनगर बगिचा व रेखा कॉलनी मैदानासमोर, पंचवटी ते आयटीआय कॉलनीकडे जाणारा रस्ता, विलासनगर ते शेगाव नाका रोड, बियाणी चौक ते मार्डी रोड एसबीआय बँकेसमोरील रस्ता, लालखडी रोड ते अलिमनगर कब्रस्थान उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील रस्ता, विलासनगर तग पाठ्यपुस्तककडे जाणारा रस्ता, वलगाव रोड ट्रक टर्मिनसच्या पूर्वेकडील रस्त्यालगत, निदा उर्दू स्कूलसमोरील मैदानाच्या दक्षिणेकडील रस्त्यालगत, अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोड दत्तकृपा कॉलनी बोर्डसमोरील रस्त्यालगत, यशोदानगर स्मशानासमोरील रस्त्यालगत, गोपालनगर ते एमआयडीसी मिनीबायपासकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, गोपालनगर ते निंभोरा जसपना कॉलेजकडे जाणारा रस्ता, गोपालनगर ते अंबा मंगलम कडे जाणारा रस्ता, साईनगर ते अकोली गावाकडे जाणारा डीपी रस्ता.

Web Title: Season 1 on the 19th New Hawker's Zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.