रेल्वे गाड्यात विनातिकीट प्रवाशांची शोधमोहीम

By Admin | Updated: July 25, 2016 00:09 IST2016-07-25T00:09:10+5:302016-07-25T00:09:10+5:30

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्थिक उत्पन्नात झालेली घट बघता मध्य रेल्वे मुंबई विभागाने विनातिकीट प्रवाशांची शोधमोहीम सुरू केली आहे.

The search for the special train in the train carriage | रेल्वे गाड्यात विनातिकीट प्रवाशांची शोधमोहीम

रेल्वे गाड्यात विनातिकीट प्रवाशांची शोधमोहीम

विशेष पथक गठित : अमरावती, बडनेरा प्लॅटफार्मवर लक्ष
अमरावती : गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्थिक उत्पन्नात झालेली घट बघता मध्य रेल्वे मुंबई विभागाने विनातिकीट प्रवाशांची शोधमोहीम सुरू केली आहे. २१ ते ३१ जुलै या कालावधीत सप्ताहांतर्गत रेल्वे गाड्या, प्लॅटफार्म तपासणीसाठी विशेष पथक गठित करण्यात आले आहे. भुसावळ विभागात या मोहिमेतून दरदिवशी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न वाढीस लागले आहे.
रेल्वे गाड्यात विनातिकीट प्रवास करणे कायदेशिरपणे गुन्हा आहे. मात्र रेल्वेकडे तोकडे मनुष्यबळ असल्यामुळे ही बाब प्रवाशांसाठी फावत आहे. यावर्षी रेल्वेमंत्रालयाने आर्थिक उत्पन्नाचा आढावा घेतला असता मध्य रेल्वे मुंबई विभाग उत्पन्नात फारच माघारल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी विनातिकीट प्रवासी शोधमोहिम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २१ जुलैपासून भुसावळ मध्य रेल्वे विभागात विशेष पथक गठित करण्यात आले आहे. रेल्वे तिकीट विभागाशी संबंधित नसलेल्या अन्य विभागातील अधिकाऱ्यांची विनातिकीट प्रवाशांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक भुसावळ ते बडनेरा या दरम्यान एकुणच गाड्यांची तपासणी करीत आहे. बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर चार दिवसांपासून रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मची कसून तपासणी केली जात आहे. यात एक्सप्रेस, पॅसेजर व लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. विशेष पथकाला स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहे. विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्याने दंडात्मक रक्कमेचा भरणा केला नाही तर त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देवून कारागृहात पाठविले जाते. रेल्वे गाड्यात विनातिकीट प्रवाशांची शोधमोहिम सुरु झाल्याने अनेकांनी आता तिकीट घेवूनच प्रवास करायला प्रारंभ केला आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असून विनातिकीट प्रवास करणाऱ्यावर अंकुश लावता येत आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात आहे. रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवर प्रवाशांच्या गर्दी देखील वाढली आहे. (प्रतिनिधी)

लांब पल्ल्याच्या
रेल्वे गाड्या लक्ष्य
रेल्वे गाड्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची शोधमोहीम विशेष पथकाकडून होत आहे. अमरावती व बडनेरा रेल्वेस्थानकावर गत चार दिवसांपासून लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या फुकट्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. मेल, एक्सप्रेस गाड्यांना विशेषतत्वाने रेल्वे अधिकारी तपासणी करीत आहे. चार दिवसाच्या या तपासणीत अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करताना निदर्शनास आले आहे. शनिवारी दोन गाड्यांमध्ये १९ प्रवासी विना तिकीट आढळले.

विशेष पथक तपासणीमुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. किंबहुना फकट्या प्रवाशांवर लगाम लावणे सुकर झाले आहे. दोन दिवसात १९ प्रवाश्यांकडून ५२१० रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.
- व्ही. डी. कुंभारे
वाणिज्य निरिक्षक, अमरावती रेल्वे

Web Title: The search for the special train in the train carriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.