मृतदेहाच्या अवशेषासाठी माडू नदीत शोधमोहीम
By Admin | Updated: September 27, 2014 00:58 IST2014-09-27T00:58:02+5:302014-09-27T00:58:02+5:30
स्थानिक पांढुर्णा चौक परिसरातील नितीन बैस (३३ ) यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी अलीबागच्या विशेष पथकाने माडू नदीत ...

मृतदेहाच्या अवशेषासाठी माडू नदीत शोधमोहीम
वरुड : स्थानिक पांढुर्णा चौक परिसरातील नितीन बैस (३३ ) यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी अलीबागच्या विशेष पथकाने माडू नदीत शोधमोहीम राबविली. परंतु दोन दिवसांत पथकाच्या हाती काहीच लागले नाही.
मृत नितीन बैस यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी योगेश घारड, राम दुर्गे, राम बिजवे, दिनेश बारस्कर आणि कार चालक रमांकात ब्राम्हणे यांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींनी संगणमताने हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केल्याची कबुली दिली. पाचही आरोपींना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीदरम्यान पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता मृतदेहाचे अवशेष आणि सोन्याचा गोफ माडू नदीत फेकल्याची कबुली दिल्यावरुन वरुड पोलिसांनी मोर्शीलगतच्या मायवाडी येथील माडू नदीत शोध सुरु केला. यासाठी पनवेल अलीबाग येथील क्युबा डायव्हर सेंटरचे पाच सदस्यीय पथक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक यांची संयुक्त नैसर्गिक आपत्ती निवारण पथकाने नदीपात्रात शोध सुरु केला. परंतु पथकाला काहीच सापडले नाही. हत्या प्रकरणातील मृताची जळालेल्या अवस्थेतील कारमधून दोन जिवंत काडतूस मिळाली. रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. जळालेल्या कारची प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने काटेकोर तपासणी केली. या तपासणीसाठी प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावतीचे उपसंचालक विजय ठाकरे, सहायक रासायनिक विश्लेषक पी.एस. केनेसह पथक वरुडला आले होते. वरुड पोलिसांनी पाचही आरोपींविरुध्द शस्त्राच्या धाकावर अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी भादंविचे कलम ३६४, ३४ आर. डब्ल्यू ३(२५) आर्म अॅक्ट, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)