दर्यापुरात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:32+5:302021-03-28T04:12:32+5:30
दर्यापूर : नगरपालिका क्षेत्रातील शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी नगरपरिषदेच्या शिक्षकांनी मोहीम आरंभली आहे. शहरालगतच्या बनोसा, बाभळी, टाटानगर आदी भागांत ...

दर्यापुरात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम
दर्यापूर : नगरपालिका क्षेत्रातील शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी नगरपरिषदेच्या शिक्षकांनी मोहीम आरंभली आहे. शहरालगतच्या बनोसा, बाभळी, टाटानगर आदी भागांत गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता, त्यांना शिक्षणाचे ज्ञान अवगत करून देण्याकरिता शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी शिक्षकांची भटकंती सुरू आहे.
कोरोना काळ असल्यामुळे मुलांची शाळेविषयीची जिज्ञासा कमी झालेली दिसून येत आहे. शाळेतील अध्ययन अध्यापनाचे धडे या कोरोना काळाने हिरावून घेतले आहे. त्यातच शहरांमधील नदीकाठचा असलेला भाग, झोपडपट्टी, वीटभट्टी कारखाना, जिनिंग प्रेसिंग इत्यादी ठिकाणी असलेले शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी नगरपरिषदेचे शिक्षक बाहेर पडले आहेत. नगरपालिका क्षेत्रात नगर परिषदेच्या सुमारे १३ शाळा असून संपूर्ण शिक्षक या शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. प्रशासनाधिकारी प्रमोद टेकाळे, केंद्र समन्वयक बाबुराव बांबल यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक आर. बी. कोरडे, जी. एन. लायदे, सनाउल्ला खा, अ. वासिद सय्यद छोटू, माया गजभिये, रमाकांता घरडे, मुमताज अहमद खा, ललिता धुळधुळे, उषा इंगळे, मो.हनिफ पटेल, मो. फजीक करीम, मो.इरफान खा, अ. बार्शीत, बी. बी. खंडारे आदी कार्यरत आहेत.