२५ मार्चपासून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:18+5:302021-03-23T04:14:18+5:30
अमरावती : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ मार्च ते ३ एप्रिल या ...

२५ मार्चपासून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम
अमरावती : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीतील शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एजाज खान यांनी आदेश जारी केले आहेत.
विविध विभागांच्या माध्यामतून विविध वयोगटांतील शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील एकही शाळाबाह्य किंवा स्थलांतरित मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, या अनुषंगाने ही मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेंतर्गत एक ते सहा वर्षे वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनियर केजीमध्ये जात नाहीत व ६ ते १७ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम घेण्यात येणार आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर समित्यांचे गठण करण्यात आले आहे.
बॉक्स
या विभागांचा राहणार सहभाग
शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहीम उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि गावातील अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ग्रामीण भागात राबविली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड. खान यांनी सांगितले.